हत्या करण्याच्या हेतूनेच असदुद्दीन ओवैसींवर गोळीबार, आरोपींचा धक्कादायक खुलासा
AIMIM चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या गाडीवर करण्यात आलेला गोळीबार त्यांची हत्या करण्यासाठीच केला होता, असा धक्कादायक खुलासा आरोपींनी केला असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना दिली.
X
उत्तर प्रदेश निवडणूकीचे वातावरण तापले आहे. त्यातच AIMIM चे प्रमुख असदउद्दीन ओवैसी यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर देशात एकच खळबळ उडाली. तर ओवैसींच्या गाडीवर करण्यात आलेला हल्ला त्यांची हत्या करण्याच्या हेतूनेच होता, असा खळबळजनक खुलासा आरोपींनी केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उत्तर प्रदेश निवडणूकीच्या निमीत्ताने प्रचारसभा उरकून ओवैसी दिल्लीकडे जात असताना छजारसी टोलनाक्याजवळ ओवैसींच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला होत. तर त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. तर ओवैसींवर झालेल्या गोळीबारानंतर त्यांना झेड सुरक्षा देण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र ओवैसींनी संसदेत बोलताना झेड सुरक्षा नाकारली.
त्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता ओवैसींना जीवे मारण्यासाठीच गोळीबार केला होता, असा खळबळजनक खुलासा आरोपींनी केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर आरोपी सचिन शर्मा आणि शुभम यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार सचिन शर्मा याने पोलिसांना सांगितले की, त्याला मोठा नेता व्हायचे होते. मात्र ओवैसींनी केलेल्या भाषणाने अस्वस्थ झाल्यामुळे शुभम याच्यासोबत सचिन शर्मा याने ओवैसींच्या हत्येचा कट रचला. यापुर्वीही ओवैसींच्या हत्येची संधी शोधली जात होती. मात्र याआधी ओवैसींवर हल्ल्या करण्यात यशस्वी झाले नाही. त्यामुळे हापुर- गाझियाबाद महामार्गावर छजारसी भागातील टोलनाक्याजवळ त्यांनी ओवैसींच्या गाडीवर गोळीबार केला. मात्र त्यानंतर ओवैसी दुसऱ्या गाडीतून पुढील प्रवासासाठी रवाना झाले.