उमटे धरण क्षेत्रातील भीषण वास्तव दाखवणारा देखावा, गणेशोत्सवात ठरतोय आकर्षण
X
रायगड जिल्ह्यासह कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साही आणि पारंपरिक वातावरणात साजरा होतोय. सर्वत्रच पर्यावरण पूरक, विविध समस्या मांडणारे व जनजागृती आणि मानवतावादी संदेश देणारे देखावे साकारले जातं आहेत. उमटे धरण सर्वाधिक चर्चेत राहिले ते म्हणजे सभोवतालच्या गावांना वर्षानुवर्षे अनियमित, दूषित आणि गढूळ दुर्गंधीयुक्त पाण्याचा होणारा पुरवठा या कारणांनी. वर्षानुवर्षे आंदोलन, शासन दरबारी पत्रव्यवहार करून ही पाणी प्रश्न सुटताना दिसत नाही. येथील अनेक गावे, नागरिक शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी हतबल झाली आहेत. उमटे धरण क्षेत्रातील पाणी टंचाई चे भीषण वास्तव दाखविणारा उमटे धरणाचा हा देखावा ऐन गणेशोत्सवात सर्वांचे आकर्षण ठरला आहे, हा देखावा अलिबाग तालुक्यातील दिवी पारंगी या गावच्या भारत घरत आणि आणि सुप्रिया घरत यांनी अप्रतिमरीत्या साकारला आहे. #raigad #kokan #ganeshfestival ##raigadganesh #raigadganpati #umatedam