Home > News Update > सावधान! हात पिवळे होण्याआधी बँक खाते रिकामे

सावधान! हात पिवळे होण्याआधी बँक खाते रिकामे

सावधान! हात पिवळे होण्याआधी बँक खाते रिकामे
X

ऑनलाइन जोडीदाराच्या शोधमोहिमेत सर्वाधिक फसवणूक झाल्याचे प्रकार घडत आहेत. त्यात काही मुली व त्यांच्या कुटुंबीयांचे बँक खाते रिकामे करून पळ काढणारे देखील ठग ऑनलाइन बाशिंग बांधून सज्ज असतात. नवी मुंबईत अशा अनेक प्रकरणांत गुन्हे दाखल असून, काही प्रकरणे ही संबंधित कुटुंबांनी बदनामी टाळण्यासाठी दडपली आहेत.

मागील काही वर्षांत ऑनलाइनला इतके महत्त्व आले आहे की वधू किंवा वर शोधण्यासाठी देखील वेगवेगळ्या ऑनलाईन साईटचा आधार घेतला जात आहे. मात्र त्या साईटवर संबंधिताने दिलेली माहिती खरीच असते असे नाही. त्यामुळे प्रोफाईलवर दिसणारा चेहरा व माहिती खरी समजून लग्राची तयारी चालवलेल्या अनेक मुलींची ऐन वेळी फसवणूक झालेली आहे.

*अशी होते फसवणूक*

विवाह इच्छुक मुलीने एखाद्या वेबसाईटवर विवाहासाठी नोंदणी केली असल्यास तिच्या अपेक्षांची माहिती मिळवली जाते. त्यानंतर त्याच पद्धतीने बनावट नावाने मुलाची प्रोफाइल बनवून संबंधित मुलीला संपर्क साधला जातो.

प्रथमदर्शनी घातल्या जाणाऱ्या भुरळीला बळी पडून मुलगी मुलाच्या इच्छेप्रमाणे वागू लागते. त्यातूनच मुलीच्या कुटुंबीयांची आर्थिक व मुलीची फसवणूक केली जाते.

अशा पद्धतीने अनेक तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे. अशा बहुतांश प्रकरणांमध्ये संबंधित तरुणीची आर्थिक फसवणूक तर होतेच, मात्र काहीना लैंगिक शोषणाला देखील बळी पडावे लागले आहे. त्यामुळे घरबसल्या जावई शोधण्याचा मोह आवरता घ्यावा असा सल्ला डीएसपी सुरेश मेगाडे यांनी दिला आहे.

Updated : 16 Sept 2021 6:51 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top