Home > News Update > केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते पुण्यातील राजाराम पूल ते फनटाईम उड्डाणपुलाचे भूमीपूजन

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते पुण्यातील राजाराम पूल ते फनटाईम उड्डाणपुलाचे भूमीपूजन

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते पुण्यातील राजाराम पूल ते फनटाईम उड्डाणपुलाचे भूमीपूजन
X

पुणे : पुणे शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी व त्याचा फायदा नागरिकांना व्हावा या उद्देशाने विविध प्रकल्प हाती घेण्यात आले असून, त्यातील प्रकल्प म्हणजे पुण्यातील चांदणी चौक येथील बहुमजली उड्डाणपूल, वारजे येथील माई मंगेशकर हॉस्पिटल समोरील उड्डाणपूल, कात्रज चौक ते नवले पूल सहापदरी रस्ता व त्याच्या दोन्ही बाजूने सर्व्हिस रस्ता, कात्रज सहापदरी उड्डाणपुल. दरम्यान पुणे महानगर पालिकेच्या सौजन्याने राजाराम पूल ते फनटाईम हा उड्डाणपुल उभारण्यात येणार आहे या उड्डाणपुलाचे भूमिपूजन समारंभ नुकताच केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप नेते चंद्रकांत पाटील, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ , शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत पार पडला.

दरम्यान हे प्रकल्प लवकरात लवकर उभे रहावे व सुरळीत पार पडावेत म्हणून सरकार दरबारी सततचा पाठपूरावा करण्यात आला, यासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी वेळोवेळी निधी मंजूर करून प्रकल्प पूर्ततेसाठी सहकार्य केले.

राजाराम पूल ते फनटाईम हा उड्डाणपुलाचे हे आहेत वैशिष्ट्य

१) २.७४ किमी वाहतूक थेट होणार असल्याने वेळेची आणि इंधनाची बचत होणार.

२) सिंहगड रोड परिसरातील खडकवासला, नांदेड सिटी, नहे, धायरी या गावांना वाहतुकीच्या दृष्टीने फायदेशीर

३) इनामदार चौक, ब्रम्हा हॉटेल चौक, हिंगणे चौक, संतोष हॉल चौक व फनटाईम सिनेमा चौकात उजवी व डावीकडे वळणाच्या स्थानिक वाहतुकीसाठी फायदेशीर.

४) वडगाव, खडकवासला, नरे व नॅशनल हायवे वरून कात्रज पुण्याकडे ये-जा करणाऱ्या वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणार आहे.

राजाराम पूल ते फनटाईम हा उड्डाणपुलाची ही वैशिष्ट्य असून यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या काही अंशी कमी होणार आहे.

Updated : 24 Sept 2021 11:38 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top