Home > News Update > Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे हाल, बर्फवृष्टीमध्ये काढावी लागली रात्र

Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे हाल, बर्फवृष्टीमध्ये काढावी लागली रात्र

रशिया युक्रेन युध्दामुळे युक्रेन रोमालिया बॉर्डरवर विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल सुरु आहेत.

Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे हाल,  बर्फवृष्टीमध्ये काढावी लागली रात्र
X

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युध्दाचा पाचवा दिवस उजाडला आहे. मात्र अजूनही युध्द थांबलेले नाही. त्यापार्श्वभुमीवर भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तर विद्यार्थ्यांना बर्फवृष्टीत रात्र काढावी लागल्याचे चित्र आहे. ( indian students stuck in ukraine )

रशिया युक्रेन युध्दाचा वणवा पेटला असून त्याचे चटके संपुर्ण जगाला बसत आहेत. रशिया युक्रेनमधील शहरांवर बाँबवर्षावर करत आहे. त्यापार्श्वभुमीवर युक्रेनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी सरकारकडून ( indian embassy ) प्रयत्न सुरू आहेत. मात्र युध्दग्रस्त युक्रेनमध्ये विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. तर भारतीय विद्यार्थ्यांना बर्फवृष्टीत रात्र काढावी लागल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

पत्रकार स्मिता शर्मा यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत म्हटले आहे की, युक्रेन सीमेवर पोहचलेल्या 100 भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत कोणतीही मदत पोहचली नाही. तर युक्रेन रोमालिया सीमेवर विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. विद्यार्थ्यांकडून पैशांची मागणी केली जात आहे. त्यांना मारहाण केली जात आहे. त्याबरोबरच विद्यार्थ्यांना बर्फवृष्टीत रात्र काढावी लागली. मात्र त्यांच्यापर्यंत भारतीय दुतावासाचा कोणताही अधिकारी पोहचला नाही, त्यामुळे या प्रकरणात त्वरीत हस्तक्षेप करावा, अशी मागणी पत्रकार स्मिती शर्मा यांनी ट्वीटरवरून केली आहे.

दुसरीकडे भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने आतापर्यंत 800 विद्यार्थ्यांना देशात परत आणले आहे. मात्र अजूनही 15 हजार पेक्षा अधिक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. तसेच युध्दाची परिस्थिती असल्याने खाण्यापिण्यापासून विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर पोलंड आणि हंगेरी सीमेवर भारतीयांना प्रवेश देण्यात येत नाही. त्यामुळे त्याठिकाणीही विद्यार्थ्यांना प्रचंड मनःस्तापाला सामोरे जावे लागत आहे.


Updated : 28 Feb 2022 10:07 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top