Home > News Update > राज्यात Omicron च्या रुग्णांचा आकडा 8 वर, आरोग्य विभाग सतर्क

राज्यात Omicron च्या रुग्णांचा आकडा 8 वर, आरोग्य विभाग सतर्क

राज्यात Omicron च्या रुग्णांचा आकडा 8 वर, आरोग्य विभाग सतर्क
X

मुंबई : कोरोना व्हायरसचा व्हेरिएंट Omicron ने सर्वांचीच चिंता वाढवली आहे. या व्हेरिएंटने राज्यात शिरकाव केला आहे. राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण झपाट्यानं वाढत असल्याने राज्यातील आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे . राज्यात ओमीक्रॉनच्या रुग्णांची संख्या आता 8 वर गेली आहे. त्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, राज्यात Omicron चा विळखा आता अधिकच घट्ट होत चालला असून एकूण रूग्णसंख्या 8 वर जाऊन पोहोचली आहे. ज्यात मुंबई आणि पुणे प्रत्येकी 1 तर पिंपरी चिंचवड येथील 6 रुग्णांचा समावेश नव्याने समावेश झाला आहे.

पिंपरी चिंचवड येथील एक महिला नायजेरियाहून आपल्या 2 मुलींसह भारतात परतली. संबंधित कुटुंब भावाकडे आले आहे आणि अशाप्रकारे बधितांची संख्या 6 वर पोहोचली,दरम्यान सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून रुग्णांवर उपचार सुरू असून संपूर्ण खबरदारी घेतली जात असल्याचं आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले आहे.

सोबतच आजचे सर्व रुग्ण 2 डोस घेतलेले असल्याने सुदैवाने त्यांच्या जीवाला काही धोका नसेल. सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असं आवाहन आरोग्यमंत्री टोपे यांनी केलं आहे. पुण्यात सापडलेला रुग्ण हा फिनलँडहून आल्याचं सांगितलं जात आहे.तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवड येथील नायजेरियातून आलेल्या रुग्णाच्या संपर्कात येथील तिघेजण आले आहेत.

Updated : 6 Dec 2021 3:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top