Home > News Update > आर्यनची रवानगी तुरुंगात होणार की तो 'मन्नत'वर जाणार? जामीन अर्जावर आज सुनावणी

आर्यनची रवानगी तुरुंगात होणार की तो 'मन्नत'वर जाणार? जामीन अर्जावर आज सुनावणी

आर्यनची रवानगी तुरुंगात होणार की तो मन्नतवर जाणार? जामीन अर्जावर आज सुनावणी
X

क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने ताब्यात घेतलेल्या अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानसह (Aryan Khan) इतर सात आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे अभिनेता शाहरुख खानला मोठा धक्का बसला आहे. मात्र, आर्यनच्या जामिनावर पुढील सुनावणी आज (8 ऑक्टोबर) होणार आहे. तेव्हा आज आर्यनची रवानगी तुरुंगात होणार की तो 'मन्नत'वर जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान न्यायालयात आर्यन खान तसेच एनसीबीच्या वकिलांची चांगलीच खडाजंगी झाल्याचे वृत्त आहे. आर्यन खानच्या बाजूने अॅड सतीश मानेशिंदे यांनी बाजू मांडली. तर एनसीबीच्या बाजूने एएसजी अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल दिला.

मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टी प्रकरणाचा तपास सध्या एनसीबीकडून सुरु आहे. एनसीबीने आर्यन खानसह अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा यांना अटक केली आहे. या सर्व आरोपींची एनसीबी कोठडीचा कालावधी संपल्यामुळे त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. दरम्यान अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींचा एकमेकांशी संबंध आहे असा युक्तिवाद एनसीबीच्या वकिलांनी केला आहे. ड्रग्ज तस्करीचे जाळे शोधण्यासाठी त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची गरज आहे त्यामुळे त्यांच्या कोठडीत 11 ऑक्टोबरपर्यंत वाढ करावी, अशी विनंती सिंग यांनी न्यायालयाकडे केली.तर दुसरीकडे आर्यन खान यांची बाजू मानेशिंदे यांनी मांडली. त्यांनी आर्यन खानचे वकील मानेशिंदे यांनी आर्यनच्या कोठडीत वाढ करण्याची गरज नाही. आर्यनला जामीन मंजूर करण्यात यावा, अशी न्यायालयाला विनंती केली.दरम्यान दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यावर न्यायालयाने आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Updated : 8 Oct 2021 8:15 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top