Home > News Update > मराठा आरक्षणाच्या मसुद्याला मंत्रीमंडळामध्ये मंजूरी मिळाली

मराठा आरक्षणाच्या मसुद्याला मंत्रीमंडळामध्ये मंजूरी मिळाली

मराठा आरक्षणाच्या मसुद्याला मंत्रीमंडळामध्ये मंजूरी मिळाली
X

Maratha Reservation live Update : मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आज राज्यात विशेष अधिवेशन होणार आहे. नौकरी आणि शिक्षणामध्ये मराठा समाजाला १० ते १३ टक्के आरक्षण देण्यासाठी सरकार आग्रही असल्याचं समजतंय. मराठा आरक्षणाच्या मसुद्याला कॅबीनेटमध्ये मंजूरी मिळाली असून हा मसुदा अधिवेशनामध्ये दुपारी १ वाजता पटलावर ठेवण्यात येणार असल्याचं बोललं जातंय, आणि या मसुद्याचं कायद्यात रूपांतर होईल असं सूध्दा बोललं जातंय. जो आरक्षणाचा टक्का आहे तो वाढावा यासाठी राज्यातीन काही नेते प्रयत्नशील असणार आहेत. आरक्षणाची मर्यादा ही १० ते १३ टक्क्यांपर्यंत नेण्यात यावी अशी देखील काही नेत्यांची मागणी आहे.

त्यामूळे आज होणाऱ्या या विशेष अधिवेशन सत्रामध्ये नेमकं काय होणार आहे हे पाहण्यासारखं महत्वाचं असणार आहे. त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुध्दा याठिकाणी उपस्थित असणार असून काही महत्वाच्या नेत्यांची यावेळी भाषणं होणार आहेत. राज्य कॅबिनेटची बैठक आता सूरू झाल्याची माहिती मिळतेय, यामध्ये हा विषय मांडला गेलेला आहे की, ओबीसी प्रवर्गाला कुठलाही धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल यासाठी सरकार आग्रही आहे, त्यासोबतच नौकरी आणि शिक्षणामध्ये सुध्दा हे आरक्षण कायमस्वरूपी लागू होईल. त्यामुळे मराठा समाजाला विशेष आणि स्वतंत्र आरक्षण दिलं जाईल असं सुध्दा बोललं जातंय. मराठा आरक्षण देण्यासंदर्भात सरकारची भूमिका नेमकी कशी आहे, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Updated : 20 Feb 2024 11:57 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top