Home > News Update > भापजकडून जाहीर झाली राज्यातल्या २० उमेदवारांची यादी...! कोण आहेत नविन चेहरे?

भापजकडून जाहीर झाली राज्यातल्या २० उमेदवारांची यादी...! कोण आहेत नविन चेहरे?

भापजकडून जाहीर झाली राज्यातल्या २० उमेदवारांची यादी...! कोण आहेत नविन चेहरे?
X

आगामी लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. जाहीर केलेल्या या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील काही मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये नागपूर मधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावेरमधून रक्षा खडसे, बीडमधून पंकजा मुंडे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, धूळेमधून सुभाष भामरे, नंदुरबारमधून हिना गावित, या उमेदवारांची नावं आहेत. आजच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकूण २० उमेदवारांचा समावेश आहे.

भाजपकडून कुणाकुणाला डावलन्यात आलं?

राज्यात भारतीय जनता पक्षाकडून मोठ्या दिग्गज नेत्यांची नावं जाहीर केली असली तरी, अनेकांची नावं कापण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाल शेट्टी (Gopal Shetty) यांचं तिकीट भाजपकडून कापण्यात आल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. त्यांच्या जागी आता केंद्रीय मंत्री राज्यसभा सदस्य पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

याशिवाय जळगावचे विद्येमान खासदार उन्मेश पाटील यांचं नाव वगळून भाजपने स्मिता वाघ यांना तिकी जाहीर केलं आहे. तसंच अकोल्यातून खासदार संजय धोत्रे यांच्याऐवजी त्यांचा मुलगा यांना तिकीट दिलं आहे.

तसेच बीडमधून पंकजा मुंडे यांना तिकीट दिल्याने त्यांची बहीण प्रितम मुंडे यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. दुसरीकडे उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात आमदार मिहीर कोटेचा यांना तिकीट देऊन भाजपने मनोज कोटे यांना डावलन्यात आलं आहे.

भाजपकडून जाहीर झालेल्या महाराष्ट्रातल्या २० उमेदवारांची यादी (BJP candidate list for Maharashtra)

    • बीड पंकजा मुंडे
    • चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
    • रावेर - रक्षा खडसे
    • जालना- रावसाहेब दानवे
    • माढा- रणजीत निंबाळकर
    • पुणे- मुरलीधर मोहोळ
    • नागपूर- नितीन गडकरी
    • सांगली - संजयकाका पाटील
    • धुळे - सुभाष भामरे
    • उत्तर मुंबई- पियुष गोयल
    • दिंडोरी- भारती पवार
    • भिवंडी- कपिल पाटील
    • अहमदनगर- सुजय विखे पाटील
    • लातूर- सुधाकर श्रृंगारे
    • उत्तर पूर्व- मिहीर कोटेचा
    • नंदुरबार- डॉ. हिना गावित
    • वर्धा - रामदास तडस
    • नांदेड- प्रतापराव चिखलीकर
    • अकोला- अनुप धोत्रे
    • जळगाव- स्मिता वाघ

Updated : 13 March 2024 9:29 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top