मेट्रोने सुरक्षेसाठी उभारलेला पत्राचं बनला 'मुलाच्या' मृत्येचं कारण
X
चेंबुरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मेट्रोच्या निष्काळजीपाणामुळे १४ वर्षीय मुलाला त्याचा जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणाचा नेहरूनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून तपासाची सुरुवात केली आहे .
चेंबुर येथील मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी उघड्या तारेला स्पर्श झाल्याने १४ वर्षीय प्रज्वल नाखातेचा मृत्यु झाला आहे. प्रज्वल हा सिद्धार्थ कॉलनीत राहणार रहिवासी होता. त्याच्या घराच्या काही अंतरावरच मेट्रोचे काम सुरू होते. या कामासाठी मेट्रोकडून पत्रे लावण्यात आले आहे व त्या पत्र्यांवर लाईट लावण्यात आली होती. प्रज्वल या परीसारतून जात असताना, अचानक त्याच्या हात पत्र्याला लागला आणि प्रज्वलला विजेचा जोरात धक्का बसला. तिथल्या लोकांना समजताच त्यांनी लगेचच त्या तरुणाला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रज्वलला डॉक्टरांनी मृत घोषित केले. नेहरूनगर पोलिसांनी मेट्रो कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करून तपासणी सुरू केली आहे . मात्र, मेट्रोच्या भोंगळ कारभारामुळे १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. मेट्रोने त्यांच्या कुटूबीयांना मदत करावी अशी मागणी तिथल्या नागरीकांनी केली आहे.