Home > News Update > ग्लोबल कोकण परिषदेच्या माध्यमातून कोकण आणखी समृद्ध होईल- प्रविण दरेकर यांचा आशावाद

ग्लोबल कोकण परिषदेच्या माध्यमातून कोकण आणखी समृद्ध होईल- प्रविण दरेकर यांचा आशावाद

ग्लोबल कोकण परिषदेच्या माध्यमातून कोकण विभागात दीपस्तंभ तेवत ठेवण्याचे काम सुरू आहे. त्यातच येणाऱ्या काळात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दे अभियान घेतले आहे त्यातून कोकण आणखी समृध्द होईल, असा आशावाद विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला.

ग्लोबल कोकण परिषदेच्या माध्यमातून कोकण आणखी समृद्ध होईल- प्रविण दरेकर यांचा आशावाद
X

कोकणाला निसर्ग सौंदर्य लाभले आहे. मात्र कोकणात विकासाची संधी कमी होती. त्यामुळे कोकणात काहीही होत नाही, होणार नाही, अशा विचारांनी मी वैफल्यग्रस्त झालो होतो. मात्र ग्लोबल कोकण परिषदेच्या माध्यमातून कोकण आणखी समृध्द होईल, असा आशावाद विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला.

ग्लोबल कोकण परिषदेच्या माध्यमातून कोकण विभागात दीपस्तंभ तेवत ठेवण्याचे काम सुरू आहे. त्यातच येणाऱ्या काळात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दे अभियान घेतले आहे त्यातून कोकण आणखी समृध्द होईल, असा आशावाद विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना प्रविण दरेकर म्हणाले, कार्यक्रमाचे संयोजक संजय यादवराव यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. एखादा विषय १५-२० वर्षे सातत्याने लावून धरणे म्हणजे ध्येयवेडा काय असू शकतो. कोकणविषयी आपली आत्मीयता यातून दिसून येते. कोकणची उद्योजकता वाढली पाहिजे. मी गेली १५ वर्षे बघयोय. तेच तेच विषय, आंब्याचे उत्पादन वाढले पाहिजे, शेतकऱ्याना आणून फाईव्ह स्टार हॉटेलला सन्मान करायचा. रिसॉर्ट चालवतायत, पर्यटनात काम करतायत, पाण्यात कोण काम करतोय, आदिवासींसाठी काम करतोय, त्यांना सन्मानित करायचे, अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून माझ्या कोकणची समृद्धी कशी होईल, हा एकच ध्यास घेऊन संजय यादवराव काम करतायत. कार्यक्रम करणे, चळवळ चालवणे हे किती अवघड असते हे कार्यकर्ता म्हणून मला माहीत आहे.

दरेकर पुढे म्हणाले की, कोकणचे माझे नाते जिव्हाळ्याचे नाते आहे. विधिमंडळाच्या सभागृहात असे एकही माझे भाषण नाही की ज्यात कोकणविषयी मी बोललो नाही. ज्या वेळेला अर्थसंकल्पावर माझे भाषण होते, विरोधी पक्षनेता म्हणून, त्या वेळेला मी सरकारला सांगितले, ज्या कोकणाने तुम्हाला भरभरून दिले त्या कोकणावर अर्थसंकल्पात अन्याय झाला आहे. माझा अंतिम आठवडा प्रस्ताव होता त्याही प्रस्तावात मी प्रादेशिक असमतोल हा विषय घेतला आणि आमच्या कोकणावर गेली ४०-५० वर्षे कसा अन्याय झालाय हे मी सभागृहात सांगितले. केवळ हे सांगून थांबलो नाही तर कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटनासाठी ५ कोटींचे पॅकेज द्या, असे सांगितले. कोकणच्या आंबा उत्पादकांना, मासेमारी करणाऱ्या मच्चीमार बांधवाला शेतकऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे, अशी मागणी केली. कोकणच्या उर्वरित कोकण विकास महामंडळाने कोकणचे कोकण वैधानिक विकास महामंडळ स्थापन करावे, हीही मागणी केल्याचे दरेकर यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला आमदार रवींद्र फाटक, रवींद्र प्रभुदेसाई अध्यक्ष पितांबरी प्रोड्युसर प्रा. लि. आदी मान्यवर उपस्थित होते.

Updated : 29 March 2022 2:18 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top