Home > News Update > सरकारने अध्यादेश काढून तत्काळ नियुक्त्या कराव्या, आंदोलन पेटले तर त्यासाठी तुम्हीच जबाबदार असाल - प्रवीण दरेकर

सरकारने अध्यादेश काढून तत्काळ नियुक्त्या कराव्या, आंदोलन पेटले तर त्यासाठी तुम्हीच जबाबदार असाल - प्रवीण दरेकर

राज्यसरकरच्या नातर्कपणामुळे मराठा समाजावर ही परिस्थिती ओढवली असून अध्यादेश काढून नियुक्त झालेल्या मराठा समाजातील तरुणांना रुजू करावं अशी विंनती या सरकारला हात जोडून करतो अन्यथा आमच्यावर हात सोडण्याची वेळ आली तर ती देखील भूमिका घेऊ. एवढं गेंड्याच्या कातडीचा सरकार असू शकत का? अशी टीका विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर केली.

सरकारने अध्यादेश काढून तत्काळ नियुक्त्या कराव्या, आंदोलन पेटले तर त्यासाठी तुम्हीच जबाबदार असाल - प्रवीण दरेकर
X

मराठा आरक्षणाला सर्वोच न्यायालयात मिळालेल्या स्थगिती मुळे विविध पदावर मराठा समाजातील नियुक्त झालेल्या तरुणांना रुजू होता आलेलं नाही. या विरोधात मराठा समाजातील तरूण आझाद मैदानात गेल्या सहा दिवसापासून आंदोलन करत आहेत. आज या तरुणांची भेट विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी घेतली. राज्यसरकरच्या नातर्कपणामुळे मराठा समाजावर ही परिस्थिती ओढवली असल्याचा आरोप यावेळी त्यांच्याकडून करण्यात आला. एवढं गेंड्याच्या कातडीचा सरकार असू शकत का अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.

भाजप सरकारने मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत असलेले आरक्षण दिले, मात्र राज्यसरकरच्या ढिसाळ कारभारामुळे सर्वोच न्यायालयात ते टिकू न शकल्याचा ठपका ठेवत येणाऱ्या काळात हे आंदोलन पेटले तर त्यासाठी राज्यसरकार जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी दिला. गेल्या पाच दिवसापासून मराठा समाजातील तरुण आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. त्यांची साधी विचारपूसही राज्यसरकार कडून करण्यात आलेली नाही. मात्र त्याच आझाद मैदानात केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्या विरोधात आंदोलन सुरू आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार सहित महाविकास आघाडीचे नेते भेट देतायत. मात्र शेतकऱ्यांचीच मुले असणाऱ्या मराठा समाजातील तरुणांनकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचं दरेकर म्हणाले.

विरोधी पक्ष नेता म्हणून जर आम्ही आक्रमक भूमिका घेतली आणि कायदा व सुव्यवस्था बिघडली तर याची जबाबदारी आमच्यवर किंवा मराठा समाजावर राहणार नाही. सरकार अध्यादेश काढून हा विषय आपण निकालात काढू शकतो. एका बाजूला ओबीसींना चढवायचा एका बाजूला मराठ्यांना फूस लावायची असले खेळवा-खेळवीचे राजकारण थांबवून या गरीब मराठा मुलांना तात्काळ सामावून घेण्यात यावी अशी विंनती या सरकारला हात जोडून करतो हेच हात सोडण्याची वेळ जर आमच्यावर आली तर ती देखील भूमिका आम्ही घेऊ. सरकार शेतकऱ्यांचा खोटा पुळका दाखवण्याचं ढोंग करत आहे. पण शेतकऱ्यांच्या मुलांचं मात्र याना काही पडलं नाही. सरकारने इथे येऊन मुलांना भेटून निर्णय घ्यावा सर्वोच्च न्यायायलात जे काही होईल त्याची जबाबदारी आम्ही घेऊ अस दरेकर यावेळी म्हणाले.

Updated : 24 Jan 2021 7:35 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top