चित्रप्रेमींसाठी मुंबईत पर्वणी, द फ्लो या चित्रप्रदर्शनाचं आयोजन
X
कलासक्त व्यक्तींना प्रदर्शन म्हटलं की आनंदाच्या उकळ्या फुटू लागतात. अशाच कलाप्रेमींसाठी मुंबईत सोलो ट्रॅव्हलर दीपा कुलकर्णी यांच्या चित्रांचं द फ्लो हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.
या प्रदर्शनाचं उद्घाटन २४ जुलैला संध्याकाळी ४ वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रदर्शनाला यावेळी विधानपरिषदेचे सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे निंबाळकर, ज्येष्ठ कलाकार सुहास बहुलकर, प्रकाश जोशी, जसदनवाला समुहाचे चेअरमन अब्बास जसदनवाला, ज्येष्ठ अभिनेते, संजय मोने, ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या मोने इत्यादी मंडळी उपस्थित होती. शिवाय अनेक कलारसिकांनी देखील या प्रदर्शनाला आपली उपस्थिती दर्शवली होती.
सोलो ट्रॅव्हलर म्हणुन ओळख मिळवलेल्या दीपा कुलकर्णी या एक उत्तम चित्रकार देखील आहेत. त्यामुळेच त्यांनी त्यांच्या प्रदर्शनाला सुध्दा Solo Exhibition असंच म्हटलं आहे. मोकळ्या वेळेत त्यांनी चित्र काढायला सुरूवात केली आणि आता त्यांनी त्या चित्रांचं प्रदर्शन भरवलं आहे. कमलनय़न बजाज आर्ट गॅलरी, बजाज भवन, नरिमन पॉइंट येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. २४ जुलै ते ३० जुलै पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. आपण या आर्ट गॅलरीत जाऊन भेट ही देऊ शकता.
कोण आहेत दीपा कुलकर्णी?
दीपा कुलकर्णी या एक समकालीन कलाकार आहेत, ज्या सध्या फ्लुइड आर्टवर आपलं लक्ष केंद्रित करतायत. हे तंत्र पेंटिंगची एक लोकप्रिय अमूर्त शैली आहे आणि त्यात मुक्त प्रवाह असलेलं ऍक्रेलिक आणि वॉटर कलरच्य़ा शेड्स समाविष्ट आहेत. कठीण काळात शांतता मिळविण्यासाठी त्यांनी अलीकडील जागतिक महामारीमध्ये या प्रकारची कला आत्मसात केली त्यात त्यांनी स्वतःचं मन रमवलं. त्यांचं प्रत्येक चित्र वेगळी मानवी भावना आणि मूड दर्शवतं. दीपा कुलकर्णी एक व्यवस्थापन सल्लागार, सॉफ्ट स्किल ट्रेनर देखील आहेत आणि त्यांनी युरोपमधील अनियोजित एकल(सोलो) प्रवासाबद्दल युरोप…इट जस्ट हॅपन्ड हे इंग्रजी भाषेत पुस्तक देखील लिहिले आहे.