१० मार्च रोजी पुण्यात होणार सत्यशोधक समाजाचे पहिले महिला अधिवेशन
X
दि. २४ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा ज्योतिबा फुल्यांनी स्ञी, शुद्र आणि अतिशुद्रांना सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आर्थिक गुलामीतून मुक्त करण्यासाठी सत्याशोधक समाजाची स्थापना केली. महात्मा फुल्यांच्या विचारांचा वारसा नवीन पिढीपर्यंत नेण्यासाठी सत्यशोधक समाज संघातर्फे ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त आणि सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्ण वर्षपूर्तीच्या निमित्त रविवार दिनांक १० मार्च रोजी सत्यशोधक समाजाचे राज्यस्तरीय पहिले महिला अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती सत्यशोधक समाज संघाचे अध्यक्ष अरविंद खैरनार, सुनीता भगत, सचिव सुरेश झाल्टे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी नागनाथ पंचायत समिती खंडाळ्याच्या माजी सभापती शुभांगी नेवसे, संयोजिका उज्ज्वला तांबे, फुले विचारांचे अभ्यासक डॉ. दत्ताजी जाधव प्रा. हेमालता भालेराव आदी उपस्थित होते.