Home > News Update > मुंबईत होणारा फिल्मफेअर अवॉर्ड गुजरातला पळवला

मुंबईत होणारा फिल्मफेअर अवॉर्ड गुजरातला पळवला

गुजरात टुरिझमच्या सहकार्याने ६९ व्या फिल्मफेअर अवॉर्ड २०२४, हा २७ जानेवारी २०२४ रोजी पार पडणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोकृष्ट कलागुणांचा गौरव करणारा हा सोहळा मुंबई नाही तर गुजरातमधील गांधीनगर येथे पार पडणार आहे. यावरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले असल्याच दिसत आहे.

मुंबईत होणारा फिल्मफेअर अवॉर्ड गुजरातला पळवला
X

गुजरात टुरिझमच्या सहकार्याने ६९ वा फिल्मफेअर अवॉर्ड २०२४, हा २७ जानेवारी २०२४ रोजी पार पडणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोकृष्ट कलागुणांचा गौरव करणारा हा सोहळा मुंबई नाही तर गुजरातमधील गांधीनगर येथे पार पडणार आहे. यावरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले असल्याच दिसत आहे.

पत्रकार परिषदेला करण जोहर, जान्हवी कपूर, वरुण धवन उपस्थित होते. त्यांच्यासोबत रोहित गोपकुमार आणि पॅनेलचे इतर सदस्य ही उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वरुण आणि जान्हवीने दीप प्रज्वलन करून केली. अनेक स्टार्स या अवॉर्ड मध्ये सहभागी होणार आहेत. तसेच करीना कपूर ही या सोहळ्यात धमाकेदार परफॉम करण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. या वर्षीचा फिल्मफेअर अवॉर्ड्स हा दोन दिवसीय सोहळा असणार आहे. यंदा सूत्रसंचालनाची जबाबदारी आयुष्मान खुराना, करण जोहर आणि मनीष पॉल यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. शंतनू आणि निखिल यांचा फॅशन शो आणि पार्थिव गोहिल यांचा संगीत कार्यक्रम पार पडणार आहे.

मुंबईतील फिल्म इंडस्ट्री पळवण्याचा डाव

उद्योगांपाठोपाठ फिल्मफेअरही गुजरातला, हा तर मुंबईतील फिल्म इंडस्ट्री पळवण्याचा डाव आहे असा आरोप जयंत पाटील यांच्या पाठोपाठ विजय वड्डेटीवार यांनी महाराष्ट्रा सरकार वर टीका केली आहे. दरवर्षी मुंबईत होणारा प्रतिष्ठित फिल्मफेअर पुरस्कार सोहळा यावर्षी गुजरातमध्ये होणार आहे. यावरून आता विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. गुजरातनं आधी राज्यातील प्रकल्प खेचून नेले, आता फिल्मफेअरही नेला, असं म्हटलं जातंय. यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा गुजरात मधील गांधीनगर येथे पार पडणार आहे. गुजरात टुरिजमच्या सहाय्याने याच आयोजन केल जाईल. निर्माता करण जोहर याने याची घोषणा केली. 2020 चा अपवाद वगळता दरवर्षी हा सोहळा महाराष्ट्रातच झाला आहे. केवळ 2020 ल हा सोहळा आसामच्या गुहाटीला आयोजित केला होता. मात्र हा सोहळा यावर्षी गुजरात मध्ये होणार असल्याने महाराष्ट्राच राजकारण चांगलच तापल असून मुंबईतला फिल्मफेअर अवार्ड गुजरातला नेत असल्याची टीका विरोधीपक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी केली आहे.

मुंबईला कमजोर करण्याचा आणखी एक पुरावा

फिल्मफिअर पुरस्कार मुंबईच वैभव मानला जातो,मात्र तोच मुंबई बाहेर नेल्याने विरोधक सरकारवर टीका करू लागले आहेत. वेदान्त-फॉक्सकॉन, बल्क ड्रग्ज पार्क आणि टाटा एअरबस हे मोठे प्रकल्प गुजरात ला पळवले आहेत. उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगि आदित्यनाथ हे नोएडा येथे फिल्मसिटी उभी करण्याचा प्रस्ताव मंडल असून चित्रपट निर्मात्याना यासाठी मदत करण्याच आव्हान देखील केल आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता फिल्मफेअर सुद्धा बाहेर गेल्यामुळे विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. "मुंबईला कमजोर करण्याचा हा आणखी एक पुरावा " अस कॉंग्रेस नेते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील म्हणाले मुंबई च्या आर्थिक स्त्रोतावर सुद्धा हल्ला केला जात असल्याची टीका सुद्धा जयंत पाटील यांनी केली आहे.

Updated : 18 Jan 2024 12:29 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top