सत्ता स्थापनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ठाण्यात धुळवड
गेल्या आठ महिन्यापूर्वी राज्याच्या सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने आपली पहिली होळी साजरी केली आहे. मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे यांनी आपल्या ठाणे येथील निवासस्थानी धुळवडचा सण उत्साहात साजरा केला.
X
मुख्यमंत्री (Chief Minister ) एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांनी आपल्या ठाणे येथील निवासस्थानी धुळवडचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला. नातू रुद्राश कडून रंग लावून घेत त्यांनी या सणाचा आनंद द्विगुणित केला. धुलीवंदनाचा निमित्ताने ठाणे येथील शुभ दीप या निवासस्थानी मुख्यमंत्री (Chief Minister ) शिंदे यांनी आपल्या कुटुंबियांच्या तसेच सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस बांधवासोबत सुद्धा रंगपंचमीचा सण साजरा केला. राज्यात महायुती सरकार अस्तित्वात आल्यानंतर सर्वच सण उत्साहात आणि आनंदात सण साजरे केले जाऊ लागले. दहीहंडी, गणेशोत्सव, दिवाळी आणि आता होळी पाठोपाठ धुलीवंदनाचा सणही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
राज्यातील जनतेला नैसर्गिक रंगाचा वापर करून, पर्यावरणपूरक पध्दतीने होळीचा सण साजरा करण्याचे आवाहन करून मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांनी राज्यातील जनतेला होळी आणि धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या कुटुंबाची सुरक्षा पाहणारे पोलीस बांधव, सर्व कर्मचारी आणि कार्यकर्त्यांसोबत सुद्धा मुख्यमंत्र्यांनी रंग खेळले. तसेच त्यांना गोड देखील खाऊ घातले. जनतेचा मुख्यमंत्री हा जनतेमध्ये मिसळून धुळवड साजरी करत असल्याचे पाहुन पोलिसांनी देखील आपणेपणाने रंग लावून घेत त्यांच्यासह रंगपंचमी साजरी केली.
राज्यात कालपासून ठिकठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे, त्याबद्दल संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे मुख्यमंत्री (Chief Minister ) एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठिशी राज्य सरकार ठामपणे उभे असून त्यांना लागेल ती सर्व मदत केली जाईल, असेही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पत्नी सौ. लता शिंदे, वडील संभाजी शिंदे आणि सर्व पोलीस बांधव तसेच बंगल्यातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.