Home > News Update > आंबेवाडी येथील प्रसिद्ध धबधबा ओसंडून वाहू लागला

आंबेवाडी येथील प्रसिद्ध धबधबा ओसंडून वाहू लागला

आंबेवाडी येथील प्रसिद्ध धबधबा ओसंडून वाहू लागला
X

पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी येथील धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहीत झाला आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही या कोसळणाऱ्या धबधब्यावर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असल्याने येथे परवानगी कधी मिळणार, याची सगळ्यांना प्रतीक्षा आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातुन व इतर राज्यातून हजारो पर्यटकांसाठी पावसाळी पर्यटनात हा धबधबा आकर्षणाचा केंद्र असतो. कोरोनामुळे येथे पर्यटकांस येण्यास बंदी असल्याने परिसरात पर्यटक नसल्याने शुकशुकाट जाणवत आहे.

सह्याद्रीच्या कडेकपारीतून कोसळणारा धबधबा, दाट धुके, सतत रिमझिम पडणारा पाऊस, या सर्व गोष्टी एकत्रित आंबेवाडी धबधबा आणि तेथील परिसरात अनुभवण्यास मिळतात. म्हणूनच गेल्या दहा वर्षापासून हे स्थळ पर्यटकांचे पावसाळी पर्यटनाचे केंद्र बनले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने हा धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे.

Updated : 16 Sept 2021 11:40 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top