गोरगरीबांना न्याय देण्याचा वैशाली साळवे या महिला ग्रामपंचायत सदस्याचा निर्धार
X
मोखाडा तालुक्यातील धामणशेत कोशिमशेत ग्रुप ग्रामपंचायत मधील प्रभाग क्रमांक 4 मध्ये वैशाली रविंद्र साळवे यांनी 204 ह्या प्रथम क्रमांकाची मते मिळवून दणदणीत विजयी मिळवला आहे
प्रभाग क्रमांक 4 मध्ये 3 जागा असून एक पुरुष तर 2 जागा ह्या महिलांसाठी राखीव होत्या या मधील पुरुष गटातून विवेक धनगर हे बिनविरोध निवडून आल्याने 2जागांसाठी लढत पहायला मिळाली यामध्ये शिवसेना शिंदे गट पुरस्कृत जय आदिवासी क्रांती पॅनल कडून वैशाली साळवे व कलीता तुकाराम निकम तर भाजपा पुरस्कृत ग्रामविकास विकास पॅनल कडून पदमा हितेश धनगर व पुष्पा विजय नांदे यांच्या मध्ये लढत झाली यावेळी अटीतटीच्या लढाईत जय आदिवासी क्रांती पॅनलने विजय खेचून आणला
यावेळी पराभूत झालेल्या पदमा धनगर यांना 156 व पुष्पा नांदे 158 मते मिळाली असून विजयी झालेल्या कलीता निकम यांना 189 हि दुसऱ्या क्रमांकाचीमते मिळाली तर वैशाली साळवे यांना 204 सर्वाधिक प्रथम क्रमांकाची मते मिळवून दणदणीत विजय मिळवला आहे तर सेनेने सरपंच पदाच्या चाव्या देखील खेचून आणल्या असून यानिवडणुकीत मतदारांनी भाजपाचा सपशेल नाकारल्याने भाजपाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे मतदार बंधू भगिनींनी आमच्या पॅनलवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही त्यांचे आभारी असून माझ्या प्रभागात जास्तीच जास्त विकास कामे करून माझ्या आदिवासी बांधवाना न्याय मिळवून देईन अशी ग्वाही वैशाली साळवे यांनी बोलताना दिली.