डॉक्टरांसाठी संसदेत घेण्यात आलेला निर्णय हा स्वागतार्ह - डॉ. अविनाश भोंडवे
X
सध्या देशभरात वैद्यकीय क्षेत्रात एखाद्या डॉक्टरने निष्काळजीपणा केला आणि त्यामुळे जर रुग्णाचा मृत्यू झाला तर त्या डॉक्टरवर भारतीय दंड संहितेच्या कलम 304 A नुसार गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होत होता. मात्र, या सर्व बाबींकडे डॉक्टरांची संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनने अनेकदा सरकारचे लक्ष वेधलं होतं. या कायद्यात बदल करण्याच्या सूचनाही केल्या होत्या. यासंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी संसदेत घेण्यात आलेला निर्णय हा स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान यावर बोलताना डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले की " कित्येकदा गंभीर परिस्थितीमुळे, रुग्णाचा मृत्यू होतो. वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांकडून उपचार घेत असताना एखाद्या व्यक्तीचा, रुग्णाचा मृत्यू होतो. त्यावेळी 304 A कलम सर्वोच्च न्यायालयाने काही काळा करिता लागू केलं होतं. परंतू दंड विधानामध्ये त्याची मान्यता नसल्याने अनेक ठिकाणी डॉक्टरांविरुद्ध 304 A कलम लावल जाऊन त्यांना अ जामिनपात्र गुन्हा असं ठरवून त्यांना तरुंवासात किंवा कैदेत टाकलं जात होतं, त्यांच्यावर खटला दाखल केला जात असे. त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशने उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 304 A म्हणजे जामिनपात्र गुन्हा धरावा अशी मागणी गेली अनेक वर्ष केल्यानंतर आज संसदेत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. हि सुधारणा अतिशय स्वागतार्ह आहे. कोणते डॉक्टर आपल्या रुग्णाला उपचार करत असताना त्यांच्याकडून रुग्ण वाचावा या दृष्टीकोणातून प्रयत्न करत असतात. वैद्यकीय शास्त्र हे पूर्ण शास्त्र नाही, हे अपूर्ण शास्त्र आहे. उपचार करत असताना रुग्ण जर गंभीर असेल तर तो मृत्यू पावू शकतो त्याला कितीही योग्य व्यवस्थित उपचार दिले गेलेतरी रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो, त्यामुळे गैरसमजामुळे अनेकदा 304 A गुन्हा दाखल केला जात होता. परंतू आता हा गुन्हा जरी दाखल झाला तरी त्यासंबंधातील योग्य पूरावे दाखल केल्यानंतर डॉक्टरांची निश्चीत या गुन्ह्यामधून सुटका होऊ शकेल त्यामुळे ही सुधारणा ही स्वागतार्ह असल्याचं डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले आहेत .
इंडियन मेडिकल असोसिएशन मागणी
एखाद्या डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यावर गुन्हेगारी स्वरूपाचा कलम 304 ए नुसार गुन्हा दाखल केल्या जात होता ...यावर विचार करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन ने 30 नोव्हेंबर रोजी सरकारला पत्र देऊन याकडे लक्ष वेधलं होतं व या कायद्यात बदल करण्याच्या सूचनाही केल्या होत्या त्यानुसार काल (बुधवारी) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत माहिती देत प्रचलित कायद्यात नवीन बदल करून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे जर मृत्यू झाला तर त्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचा 304 A या कलमातून वगळण्यात येणार असून त्यात नवीन बदल करण्यात आला असल्याची माहिती दिली आहे. नक्की नवीन बदल काय , कसा असेल असेल याबाबत अद्यापही स्पष्टोक्ती नाही. मात्र तरीही देशभरात या निर्णयाचं डॉक्टरांच्या संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशन , इंडियन मेडिकोज , फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन या सर्व संघटनांनी या निर्णयाच स्वागत केल आहे. सर्व स्तरातून डॉक्टर्स या निर्णयाचे स्वागत करत आहेत.