Home > News Update > MSEB चे संचालक विश्वास पाठक यांना नागरिकांनी पाडले तोंडावर

MSEB चे संचालक विश्वास पाठक यांना नागरिकांनी पाडले तोंडावर

अदानी समूहाला (Adani Group) वीज वितरणाचा परवाना देण्यात येत असल्याच्या विरोधात राज्यभरातील महावितरणचे कर्मचारी 72 तासांच्या संपावर आहेत. त्यापार्श्वभुमीवर MSEB चे संचालक विश्वास पाठक यांनी केलेल्या दाव्याची नागरिकांनी चांगलीच चिरफाड केल्याची पहायला मिळाली.

MSEB चे संचालक विश्वास पाठक यांना नागरिकांनी पाडले तोंडावर
X

राज्यातील वीज वितरणाचा महावितरणकडे (Mahavitaran) असलेला परवाना अदानी समूहाला (Adani Group) देण्यात येणार असल्याचा विरोध करण्यासाठी राज्यभरातील वीज वितरण कर्मचारी संपावर (Mahavitaran Worker on Strike) आहेत. मात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांमार्फत वीज व्यवस्था सुरळीत ठेवण्यात येणार असल्याचा दावा महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यातच MSEB चे संचालक आणि भाजपचे समन्वयक असलेल्या विश्वास पाठक (Vishwas Pathak Tweet) यांनी ट्वीट केले आहे. नागरिकांनी भयभीत होऊ नये. वीज कर्मचारी हे संपाविषयी भूमिका बदलतील याची खात्री आहे. अन्यथा पर्यायी व्यवस्था झाली असल्याने विद्यूत पुरवठा सुरळीत राहील याची खात्री बाळगावी, असं मत विश्वास पाठक यांनी व्यक्त केले आहे.

विश्वास पाठक यांच्या दाव्यानंतर त्यांना रिप्लाय देतांना @KunalDugad या ट्वीटर वापरकर्त्याने म्हटले आहे की, बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे रात्री 2 पासून वीजपुरवठा खंडीत आहे.

@saffronengg या ट्वीटर वापरकर्त्याने विश्वास पाठक यांना धारेवर धरत "अरे सर काय खोटं बोलता. यवतमाळ जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडित झालाय २ तासांपासून. कुठं आहे पर्यायी व्यवस्था??" असं म्हटले आहे.

@SadawarteRahul यांनी विश्वास पाठक यांच्या ट्वीटवर रिप्लाय करताना म्हटले आहे की, पुण्यातील सिंहगड भागात काल रात्रीपासून लाईट नाही. याकडे लक्ष द्या.

@itjustlogic यांनी विश्वास पाठक यांच्या ट्वीटरवर रिप्लाय करताना म्हटले आहे की, गरिबांचे हाल बंद करावे. कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. बील भरून पण लोकान त्रास. थू थू अश्या सेवेला ला, अशी आक्रमक प्रतिक्रीया दिली आहे.

@hrishi0412 यांनी म्हटलं आहे की, थापा मारणे बंद करा आणि लवकर वीज पुरवठा सुरळीत करा. खोटी आश्वासनं देणं हे राज्यकर्त्यांचे काम असतं तुमचं नाही, असं म्हणत विश्वास पाठक यांना टोला लगावला आहे.

Updated : 4 Jan 2023 8:50 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top