रिक्षा – टॅक्सी दरवाढी संदर्भात स्वतः मुख्यमंत्री घेणार बैठक – उदय सामंत
X
गेल्या काही काळामध्ये झालेल्या इंधन दरवाढीमध्ये सीएनजी चे भाव देखील वधारले आहेत. याचा फटका सर्वच रिक्षा आणि टॅक्सी चलकांना बसला होता त्यामुळे सर्व रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी दरवाढीबाबत संप पुकारला होता. त्यांच्यासोबत या संपाबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बैठक घेऊन संप मागे घेण्यास सांगितले व दरवाढी संदर्भात स्वतः मुख्यमंत्री बैठक घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
गेल्या वर्षभरापासून सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे रिक्षा आणि टॅक्सी चालक हे संतप्त झाले होते. कारण इंधनाची दरवाढ होत होती पण प्रवासी भाड्यामध्ये वाढ होत नव्हती त्यामुळे या सर्व चालक मालक संघटनांनी दरवाढीसाठी संप पुकारला होता. या संपामुळे प्रवाशांचे देखील हाल झाले असते. या संदर्भात सर्व संपकऱ्यांसोबत उद्योग मंत्री यांनी बैठक घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावर त्यांनी माध्यमांसमोर, " १५ तारखेपासुन रिक्षा चालक मालक संघटनांनी जो संप पुकारला होता त्यावर मी बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी मला तसं सांगितलं होतं. मी त्यांना विनंती केली की आपण संप पुकारल्यास नागरीकांना त्याचा त्रास होऊ शकतो. आणि ही जबाबदारी पुर्णपणे शासनाची राहते. ज्य़ा डीजी आणि सीपीं सोबतपत्रव्यवहार झालेला आहे त्यांच्यासोबत बैठका घेणार आहोत. शिवाय आपल्या दरवाढी संदर्भात मुख्यमंत्री स्वतः बैठक घेतील आणि त्यानंतर तो निर्णय होईल." अशी प्रतिक्रीया दिली.