रेस्क्यू टीमचे धाडसी कार्य अभिमानास्पद- खासदार सुनिल तटकरे
X
महेश सानप व रेस्क्यू टीमचे धाडसी कार्य उल्लेखनीय व अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार खासदार सुनिल तटकरे यांनी काढले.महापुरात जीव धोक्यात घालून 200 हुन अधिक नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या महेश सानप यांचा खासदार तटकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
महापुरात स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांना जीवदान देण्याचे महान कार्य त्यांनी केले. अतिवृष्टी व महापुरात जिवाच्या आकांताने बचावासाठी धडपडणाऱ्या व मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी महेश सानप व त्यांची टीम देवदूत बनून आले असं खा.तटकरे यावेळी म्हणाले.
महेश सानप यांच्या वाईल्डर वेस्ट अँडव्हेंचर या टीमने महाड येथे २२ जुलै रोजी आलेल्या पुराच्या पाण्यातून २०० जणांचे प्राण वाचवून बचावकार्याची धुरा यशस्वीरित्या सांभाळली. जग प्रसिद्ध असणारी महेश सानप यांची वाईल्डरवेस्ट अँडव्हेंचर ही संस्था, जीवाची पर्वा न बाळगता नेहमी मदतकार्यात सहभागी होत असते, निसर्गाचा प्रकोप होऊन महापूर आला होता. या पुरामुळे संपूर्ण महाडला पाण्याचा वेढा दिला होता. पाणी शहरात शिरल्याने बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते.
संपर्क यंत्रणा कोलमडल्या होत्या , वीज पुरवठा देखील बंद झाला होता. येथील परिस्थिती अधिकच बिकट होती.घरात अडकलेल्या लोकांना भर पाऊसात वर छतावर बसण्याची वेळ आली होती.मदतीचे सर्व मार्ग बंद झाले होते तर एनडीआरएफचे पथक मुंबई गोवा महामार्गावर पाणी असल्याने अडकून राहिले होते.
परंतु अशा कठीण परिस्थितीत सुध्दा जीवाची पर्वा न बाळगता कोलाड येथील वाईल्डरवेस्ट अँडव्हेंचरचे महेश सानप व त्यांची टीम यांनी पुराच्या पाण्यात अडकलेल्या २०० पेक्षा जास्त जणांचे प्राण वाचवत बचावकार्याची धुरा यशस्वीरित्या सांभाळल्याबद्दल व प्रतिकुल परिस्थीतीत असामान्य कार्य केल्याबद्दल खा.सुनिल तटकरे यांनी महेश सानप यांचा सत्कार केला. यावेळी आ.अनिकेत तटकरे, राकेश शिंदे उपस्थित होते.