शारीरिक संबंधांबाबतचं विधान इंदुरीकर महाराजांना भोवलं
X
महाराष्ट्रातील सुप्रसिध्द किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या नावाची चर्चा नेहमीच सोशल मीडीयावर होत असते. अनेकदा इंदुरीकर महाराज हे आपल्या वक्तव्यावरून वादाच्या भोवऱ्यात आडकले आहे. ते आता पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. एका विधानाप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे इंदुरीकर यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे.
किर्तनकार इंदुरीकरांना त्यांचे बेताल वक्तव्य आता त्यांच्या अंगाशी आलं आहे. इंदुरीकरांनी आपल्या किर्तनातून शरीर संबंधावर भाष्य केलं होतं. "सम आणि विषम तारखेला शरीर संबंध ठेवला तर मुलगा आणि मुलगी होते "असं इंदुरीकर महाराज म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून खळबळ उडाली आहे. त्यामुळे अंधश्रध्दा निर्मुलन समिती औरंगाबाद न्यालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर आज कोर्टाने निर्णय दिला आहे. त्यामुळे इंदुरीकरांच्या अडचणीत आता वाढणार आहेत.
इंदुरीकरांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, असे आदेश औरबाद कोर्टाने दिले आहेत. अंदश्रध्दा निर्मुलन समितीने त्यांच्या विरोधात कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल केली होती. हा गुन्हा रद्द करावा या करीता इंदुरीकर यांनी सेशन कोर्टात याचिका दाखल केली आहे. सेशन कोर्टाने त्यांच्यावरील गुन्हा रद्द केला होता. त्यानंतर हे प्रकरण औरंगाबाद खंडपीठात गेलं. त्यावर सुनावणई झाली असता कोर्टाने इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
काय होत प्रकरण?
इंदुरीकर महाराजांचा शिर्डीतील किर्तनामधील व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये ते म्हणालेत की “स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते अस म्हणाले होते
या प्रकरणी वकील काय म्हणाले?
इंदोरीकर महाराज यांनी एका कीर्तनावेळी सम तिथीला स्त्री संग झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते असं विधान केलं होतं. मात्र हे विधान गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असून PCPNDT कायद्याच्या कलाम 22 चे उल्लंघन असल्याचा आरोप करत त्यानुसार PCPNDT सल्लागार समितीने निवृत्ती महाराज इंदोरीकर यांना नोटीस पाठवून खुलासा मागितला होता. त्याच दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल करावा म्हणून प्रथम वर्ग न्यायालयात 156 (3) याचिका करण्यात आली होती, त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र सत्र न्यायालयाने हा आदेश रद्द केला होता. या निर्णयाला याचिककर्त्याने खंडपीठात आव्हान दिले होते. त्यावर सुनावणी करताना खंडपीठाने प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे आणि सत्र न्यायालयाचा निकाल रद्द केला आहे. त्यामुळे आता खंडपीठाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे, अशी प्रतिक्रिया याचिकर्त्यांचे वकील जितेंद्र पाटील यांनी सांगितलं.