संत गुरु रविदास महाराज यांची 648 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी...!
X
मन चंगा तो कटोती मे गंगा...!
बीड : संत गुरु रविदास महाराज यांची 648 जयंती सार्वजनिक उत्सव समिती बीड त्यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे यामध्ये मुख्य आकर्षण म्हणजे बीड शहरातील सामाजिक न्याय भवन येथून गुरु रविदास महाराज यांचे मूर्तीची मिरवणूक काढण्यात येणार असून ही मूर्ती पहिल्यांदाच बीड शहरात येत असल्याने हे मुख्य आकर्षण ठरणार आहे त्याचबरोबर वृक्षारोपण व व्याख्यानमालेचे आयोजन देखील केलेले होते. गुरु रविदास महाराजांनी म्हटले होते कि,
ऐसा चाहू राज मै जहा मिले सबन को अन्न छोट बडो सम बैसे रविदास रहे प्रसन्न...!
याच मनी प्रमाणे या पृथ्वीतलावरील प्रत्येकाला अन्न मिळालं पाहिजे प्रत्येक जण समाधानी झाला पाहिजे प्रत्येक माणूस समाधानी असला पाहिजे. गुरु रविदास महाराज हे समता बंधुता मानवतावादी व विज्ञानवादी विचारांचे संत म्हणून गुरु रविदास महाराज यांच्याकडे पाहिलं जातं गेली सहाशे अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वी त्यांनी मांडलेले जे विचार आहेत ते आजही समाजाने जिवंत ठेवण्याचे काम समाजाने केलं आहे आणि प्रत्येक घराघरांमध्ये हे विचार पोहोचले पाहिजेत याच्यासाठी प्रत्येकाने काम केलं पाहिजे.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 1953 मध्ये दिल्ली येथे गुरु रविदास महाराज यांची जयंती साजरी केली होती आणि या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरु रविदास महाराज यांना अनटचेबल हा महत्त्वाचा ग्रंथ गुरु रविदास महाराज यांना अर्पण केला, क्रांतिकारी मानवतावादी विज्ञानवादी विचारवंत गुरु रविदास महाराज यांचे विचार आजही एक प्रेरणादायी विचार म्हणून समाजामध्ये ठाम आहेत जातीयवादाच्या विरोधामध्ये त्यांनी ठोस पावले उचलली आणि समाजामध्ये एकता निर्माण व्हावी यासाठी अनेक वेळा त्यांनी प्रयत्न केले.
जाति जाति में जाति है,
जो केतन के पात,
रैदास मनुष ना जुड सके
जब तक जाति न जात...!
याचप्रमाणे माणूस देखील जातीजातीमध्ये वाटला गेला आहे आणि जातीमध्ये वाटल्यामुळे एकमेकांमध्ये द्वेष निर्माण होत आहेत आणि त्यासाठी माणसाने जाती-जातीमध्ये न वाटता एक मनुष्य हीच जात आहे असे गुरु रविदास महाराज यांनी सांगितले.
ही मिरवणूक सामाजिक न्याय भवन बीड येथून निघून सार्वजनिक गुरु रविदास महाराज चौक
या जयंतीचे अध्यक्ष पांडुरंग रामगुडे, बाळासाहेब राऊत, विलास बामणे, पुरुषोत्तम भोसले, परमेश्वर जाधव, सुनील माने, वशिष्ठ तावरे, राजेंद्र भोपळे, किसन तांगडे, पप्पू जी कागदे, अजिंक्य चांदणे, अविनाश गंडले, हरिदास तावरे,संदीप उपरे, उमेश शिंदे, गणेश मस्के, पप्पू मराठे, दिलीप बनसोडे, अरुण कांबळे, रवी माने, किरण राजगिरे, गायकवाड किशोर, मनोज कांबळे, अंगद कांबळे, महादेव डोईफोडे, बाळासाहेब राजगिरे या सर्व समाज बांधव सर्वजण गुरु रविदास महाराजांच्या जयंतीस उपस्थित होते