इतिहास समजून घ्या... दोन्ही समाजाने आपसात लढू नका - माजी न्यायमूर्ती बी. जी कोळसे पाटील
X
नांदेड जिल्ह्यातील रोही पिंपळगाव येथील मागासवर्गीय समाजावर गावाने बहिष्कार टाकल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी दोन्ही समाजाला आपसात लढू नका. आपल्या महापुरुषांचा इतिहास समजून घ्या... आणि सामंज्यस्यातून हा वाद मिटवा असे आवाहन गावातील दोन्ही समाजाला केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि इतिहास सांगताना, मी स्वतः या गावाची भेट घेऊन दोन्ही समाजातील लोकांशी बोलणार असल्याचं माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना सांगितलं आहे.
पाहा काय म्हणतायेत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील....
काय आहे प्रकरण?
नांदेड जिल्ह्यातील रोही पिंपळगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करताना बौद्ध समाजातील तरुणांनी जयघोष केला. यावरून दुसऱ्या समाजातील तरुणांनी जातीवाचक शिवीगाळ करत या तरुणांना मारहाण केली असता, यामुळे गावात तणाव वाढला. या प्रकरणी अॅरट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर गावाने मागासवर्गीयांवर बहिष्कार टाकला आहे.
गावात दोन समाजात तणाव झाल्यानंतर मेडिकल औषधे, जीवनावश्यक वस्तू, किराणा सामान, पिठाची गिरणी मागासवर्गीय समाजासाठी बंद करण्यात आल्याचे किरण केळकर या तरुणाने सांगितलं. त्यासोबत दूध व्यवसाय करणाऱ्या मागासवर्गीय तरुणांकडून डेअरीत दूध खरेदी देखील बंद केल्याचा प्रकार या गावात घडला. तसंच निधन पावलेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारी लाकडेही घेण्यास मज्जाव करण्यात आले.