हिजाबचं लोण मुंबईतही, आचार्य कॉलेजमध्ये हिजाबवरून तणाव
X
कर्नाटकमधल्या एका कॉलेजमधील हिजाब बंदी (Hijab Ban) चा वाद शमल्यानंतर आता मुंबईतही त्याच लोण आलंय. मुंबईतल्या आचार्य कॉलेजमध्ये हिजाब घालून जाणाऱ्या काही विद्यार्थीनींना कॉलेजमध्ये प्रवेश नाकारल्यानं काही वेळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, कॉलेजनं ८ ऑगस्टपर्यंत हिजाब घालून कॉलेजमध्ये येण्यास प्रवेश करण्यास परवानगी दिली असल्याचं विद्यार्थीनींनी सांगितलं. त्यानंतर पालक आणि शिक्षक यांची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीनंतर पुढील निर्णय होईल, असं विद्यार्थीनींनी सांगितलं.
चेंबूर इथल्या एन.जी.आचार्य कॉलेजमध्ये २ ऑगस्ट रोजी काही विद्यार्थींनी हिजाब अर्थात बुरखा घालून कॉलेजमध्ये प्रवेश करणार होते, त्याचवेळी त्यांना गेटवर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी प्रवेश नाकारला. या विद्यार्थींनींनी कॉलेजच्या नियमित गणवेशाच्या वर हिजाब घातला होता. या विद्यार्थींनींनी महाविद्यालयात प्रवेश केल्यानंतर हिजाब काढू, असं सांगितलं. मात्र, सुरक्षा रक्षकांनी त्यांना प्रवेश नाकारला. कॉलेजचा गणवेश घालण्यास कुठलीच अडचण नाहीये, मात्र कॉलेजमध्ये हिजाब काढण्यास जागा उपलब्ध करून दिली तर तिथं हिजाब काढून विद्यार्थींनी येतील, अशी भूमिका हिजाब घातलेल्या विद्यार्थींनींनी मांडलीय. मात्र, कॉलेजचं प्रशासनं आपल्या भूमिकेवर ठाम असल्यानं कॉलेजच्या गेटवरच काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
आचार्य कॉलेजमध्ये अनेक वर्षांपासून हिजाब घालून येणाऱ्या विद्यार्थीनी कॉलेजच्या आत प्रवेश केल्यानंतर हिजाब काढून ठेवत कॉलेजचा गणवेश परिधान करत असतात. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्यानं तणाव निवळला.