महाशिवरात्रीला दर्ग्यावर कारवाईच्या अफवेने पुण्यात तणाव
पुणे : शेख सल्लाह दर्गा परिसरात अनधिकृत असणाऱ्या अतिक्रमनावर करवाई होणार. अश्या अफवेनंतर पुण्यातील कसबा पेठ परिसरात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव एकवटले होते. कारवाईच्या खोट्या अफवेनंतर काही काळ परीसरात तणाव निर्माण झाला होता.
दर्ग्याच्या जागेवर पुण्यश्र्वर (शंकराचे) मंदिर असल्याचा दावा हिंदू संघटनांकडून गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र संबंधित ठिकाणी मज्जितच आहे, असा दावा मुस्लिम समाजाकडून करण्यात येत आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून यासंदर्भात न्यायालयात कारवाई चालू आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेकडून संबंधित दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामावर अतिक्रमणाची कारवाई होणार असल्याची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र या नोटीसीला आवाहन दिल्यानंतर कारवाई पुढील काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती.
या सर्वांच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्रीच्या रात्री दर्ग्यावर कारवाई करण्यात येणार. अशा पद्धतीची अफवा प्रसारमाध्यमातून पसरवण्यात आली. या अफवेमुळे मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव कसबा पेठेतील या दर्गा परिसरामध्ये एकवटले. संबंधित ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या माध्यमातून संबंधितांना आश्वासित करण्यात आले आहे की सध्या तरी कोणत्याही प्रकारची कारवाई मज्जित परिसरामध्ये होणार नाही. कारवाई होणार आहे ही केवळ अफवा होती. याची नोंद सर्वांनी घ्यावी असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
या
सर्व प्रकरणाच्या संदर्भामध्ये पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी संबंधित प्रकार हा अफेमधून घडलेला असून, कुणीही या फोनवर विश्वास ठेवू नये. कायदा सुव्यवस्था निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नये. अफवा पसरवणाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी संयम पाळावा. असे आव्हान पुणे पोलीस आयुक्त यांनी केले आहे. संबंधित या सर्व प्रकरणाच्या अनुषंगाने दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी विशेष बैठक देखील बोलवण्यात आली आहे.