Home > News Update > टेलीप्रॉम्प्टरने केली मोदींची बोलती बंद, मोदी सोशल मीडियावर ट्रोल

टेलीप्रॉम्प्टरने केली मोदींची बोलती बंद, मोदी सोशल मीडियावर ट्रोल

- पंतप्रधान नरेंद्र मोदी 1-2 तास सलग भाषण कसे करतात? असा प्रश्न अनेकांना पडतो. तर पंतप्रधान भाषण करण्यासाठी टेलिप्रॉम्प्टरचा वापर करतात, असा आरोप विरोधकांकडून केला जातो. यापार्श्वभुमीवर सोमवारी पंतप्रधानांचा टेलिप्रॉम्प्टर बंद पडल्याने ट्वीटरवर मोदी मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाले आहेत.

टेलीप्रॉम्प्टरने केली मोदींची बोलती बंद, मोदी सोशल मीडियावर ट्रोल
X

देशाचे पंतप्रधान सलग भाषण कसे देतात? हा प्रशअन अनेकांना पडत होता. मात्र या प्रश्नाची सोमवारी बोलताना पोलखोल झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टेलिप्रॉम्प्टर बंद पडल्याने ते बोलताना अडखळले. तर त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. याबरोबरच मोदी मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाले आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी टेलीप्रॉम्प्टर चा वापर करतात आणि ते टेलीप्रॉम्प्टर शिवाय बोलू शकत नाही, असा आरोप केला होता. तर त्यांचा जुना व्हिडीओ आता व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडीओ व्हायरल होण्याचे कारण काय?

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस अजेंड्यात दूरसंवादाद्वारे भाषण देत होते. या संवादा दरम्यान टेलीप्रॉम्प्टर खराब झाल्याने त्यांचा चांगलाच गोंधळ उडाल्याचं बोललं जात आहे. सोशल मीडियावर टेलीप्रॉम्प्टर फेल झाल्याचा दावा केला जात असून मोदींना ट्रोल केलं जात आहे.

यावरून पत्रकार विनोद कापरी यांनी ट्वीट केले आहे.

रोफी गांधी 2.0 या ट्वीटर वापरकर्त्याने म्हटले आहे की, टेलिप्रॉप्म्टर हिटलर ही राज कपूर से तुषार कपूर हो जाता है!

काय असते टेलीप्रॉम्प्टर?

माध्यमांमध्ये अनेक Anchor बातम्या वाचण्यासाठी ज्या यंत्रांचा वापर करतात. त्या यंत्राला टेलीप्रॉम्प्टर असं म्हणतात. मोदीही भाषणा दरम्यान टेलीप्रॉम्प्टरचा वापर करतात. जगभरातील अनेक नेते टेलीप्रॉम्प्टरचा वापर करत असतात.

टेली प्रॉम्पटर वेगवेगळ्या प्रकारचे असतात. राजकीय नेते पारदर्शी ग्लास प्रमाणे असणाऱ्या टेली प्रॉम्पटरचा वापर करतात. त्यामुळे ग्लास प्रमाणे असणारा टेली प्रॉम्पटर सामान्य लोकांना दिसत नाही.

Updated : 18 Jan 2022 10:07 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top