Home > News Update > बदनापूरची महिला तहसीलदार लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

बदनापूरची महिला तहसीलदार लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

बदनापूरची महिला तहसीलदार लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
X

जालना जिल्हातील बदनापूरच्या तहसीलदार सुमन मोरे यांच्यासह महसूल सहाय्यक निलेश गायकवाड यांना 30 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात लाचलुचपत प्रतिबंध विभाग जालना यांना यश आले आहे. बदनापूर शिवारातील एका शेतजमिनीची वारस हक्कानुसार भोगवटादाराची नोंद घेण्यासाठी ही लाचेची रक्कम स्वीकारण्यात आली आहे आहे तक्रारदार यांच्या आजोबांच्या नावावरील बदनापूर शिवारातील गट नंबर 85 86 मौजे रामखेडा शिवारातील गट क्र.9 मधील शेत जमीन मधील आजोबा मयत झाल्यानंतर वारस म्हणून तक्रारदार यांचे चुलते यांच्या एकत्रित कुटुंबकर्ता सातबारावर नोंद घेण्यात आलेली होती एकत्रित कुटुंबाकरीता ही नोंद कमी करून इतर वारसांची सातबारा वर ऑनलाईन नावे घेण्यासाठी अर्ज करण्यात आला होता.इतर नावांची फेर करण्याचे आदेश काढून देण्यासाठी तीस हजार रुपयांची मागणी तक्रारदार यांना करण्यात आलेली होती परंतु तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभाग जालना यांच्याकडे तक्रार केली होती त्या अनुषंगाने सापळा रचून लाच लुचपत विभागाच्या पथकाने आज तहसील कार्यालयातच लाच स्वीकारताना आरोपी महसूल सहाय्यक निलेश गायकवाड याने तहसीलदार सुमन मोरे यांना ही रक्कम स्वीकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे दरम्यान ही कारवाई जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक किरण बिडवे यांच्यासह पथकाने केली आहे.महसूल पथका मधली असलेली लाचखोरी ही चव्हाट्यावर आली आहे तहसीलदारांनीच लाच स्वीकारल्याने जालना जिल्ह्यामध्ये चर्चेला उधाण आला आहे

Updated : 4 Jan 2024 9:08 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top