Home > News Update > बॉलिवूडचा रॅपर हनी सिंगला तीस हजारी महिला न्यायालयाची नोटीस

बॉलिवूडचा रॅपर हनी सिंगला तीस हजारी महिला न्यायालयाची नोटीस

बॉलिवूडचा रॅपर हनी सिंगला तीस हजारी महिला न्यायालयाची नोटीस
X

मुंबई : बॉलिवूडचा रॅपर (Bollywood Rapper) हनी सिंगच्या विरोधात त्याची पत्नी शालिनी तलवार ने घरगुती हिंसा प्रकरणी तीस हजारी महिला न्यायालयामार्फत नोटीस बजावली आहे .शालिनी तलवार(Shalini Talwar)

यांनी हनी सिंग(Yo Yo Honey) विरोधात घरगुती हिंसाचाराबाबत(Domestic Violence) दुसरी याचिका दाखल केली आहे. या याचिकेत शालिनीने हनी सिंगवर गंभीर आरोप केले आहे. हनी सिंग आणि त्याची पत्नी शालिनी तलवार यांच्यात दुबईमध्ये काही मालमत्तांवरून मागच्या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. या मालमत्तेची हनी सिंग विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असल्याचा आरोप शालिनी तलवार यांनी केला आहे. दरम्यान कोर्टाने हनी सिंगला त्याच्या नावावर परदेशात नोंदणी केलेल्या कंपनीची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणी पुढील सुनावणी उद्या म्हणजेच 17 सप्टेंबर होणार आहे. त्याचवेळी, न्यायालयाने हनी सिंगवर संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये त्याच्या किंवा त्याच्या कंपन्यांच्या मालकीच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेबाबतीत कोणत्याही प्रकारे व्यवहार करण्यापासून रोखले असल्याचे वृत्त आहे. याआधीही शालिनी तलवार यांनी हनी सिंगच्या विरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

Updated : 16 Sept 2021 11:20 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top