Home > News Update > 'तौत्के' चक्रीवादळ: आदित्य ठाकरे थेट महापालिकेच्या नियंत्रण कक्षात

'तौत्के' चक्रीवादळ: आदित्य ठाकरे थेट महापालिकेच्या नियंत्रण कक्षात

तौत्के चक्रीवादळ: आदित्य ठाकरे थेट महापालिकेच्या नियंत्रण कक्षात
X

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 'तौत्के' हे वादळ निर्माण झालं आहे. समुद्र किनाऱ्यावरील सीमाभागांमध्ये या वादळामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. या वादळामुळे भारतीय किनाऱ्यालगतच्या राज्यांना मोठा तडाखा बसलाय. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी वरील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबईसाठी पुढील काही तास महत्त्वाचे असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. ही बाब लक्षात घेता प्रशासन कामाला लागले आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दुपारी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षास भेट दिली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील परिस्थितीचा व महानगरपालिकेद्वारे करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला.

यावेळी आदित्य ठाकरे यांच्या सोबत स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यासह महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी.वेलरासू , अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी आणि मनपा आयुक्त कार्यालयाचे सहआयुक्त चंद्रशेखर चोरे हे देखील उपस्थित होते.

Updated : 17 May 2021 5:48 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top