Home > News Update > 'तेलंगणातील हुकुमशाही सरकारला पायउतार व्हावं लागणार'-तरुण चुग

'तेलंगणातील हुकुमशाही सरकारला पायउतार व्हावं लागणार'-तरुण चुग

तेलंगणातील हुकुमशाही सरकारला पायउतार व्हावं लागणार-तरुण चुग
X

तेलंगणा राष्ट्र समितीचं हुकुमशाही सरकार पायउतार होणं निश्चित आहे. असा घणाघात भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव तरुण चुग यांनी केला चुग हे दोन दिवस तेलंगणाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी हा TRS सरकारवर जोरदार निशाणा साधला. दरम्यान चुग यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांचा आढावा देखील यावेळी घेतला.

TRS ची लंका उद्ध्वस्त होणार, असं म्हणत चुग यांनी भाजपचे मनसुबे स्पष्ट केले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत 17 सप्टेंबर रोजी निर्मल जिल्ह्यात एक भव्य रॅली होणार आहे या पार्श्वभूमीवर तरुण चुग यांनी एका बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. तसंच टीआरएस सरकारवर जोरदार निशाणा साधला. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चुग म्हणाले की, पदयात्रेत मिळालेलं समर्थन पाहून बंडी संजय यांच्या नेतृत्वात सुरु असलेली प्रजा संग्राम यात्रा तेलंगणातील परिवर्तनाचा मार्ग निश्चित करेल'.

दरम्यान यावेळी भाजप कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Updated : 12 Sept 2021 6:30 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top