Tanaji Sawant : ३ मिनिटं गेटबाहेरच, फडणवीसांच्या बंगल्याचं गेटच उघडलं नाही
मुख्यमंत्री फडणवीसांना आरोग्य विभागाच्या ३२०० कोटी रूपयांच्या कामांना स्थगिती दिल्यानं तानाजी सावंत यांच्यावरील संशय वाढलाय...
X
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात आरोग्य विभागातल्या ३२०० कोटी रूपयांच्या कामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिलीय. तत्कालीन सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा शिवसेना शिदे गटाचे आमदार डॉ. तानाजी सावंत यांनी आज फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सागर बंगला गाठला...मात्र, बराच वेळ प्रतिक्षा केल्यानंतरही बंगल्याचं गेट काही उघडलंच नाही.
सध्या विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरूय...त्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ३२०० कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती दिलीय... तत्कालीन आरोग्य मंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सागर बंगल्यावर गेले. मात्र, ३ मिनिटं वाट पाहिल्यानंतरही बंगल्याचं गेट काही उघडलचं नाही. त्यामुळं तानाजी सावंत यांना काढता पाय घ्यावा लागला...तानाजी सावंत सागर बंगल्याबाहेर असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बंगल्यातच बैठकीत व्यस्त असल्यानं सावंत यांना प्रवेश मिळाला नाही, अशी माहिती पुढं येतेय.
आम आदमी पक्षाचे विजय कुंभार यांनी आरोग्य विभागात तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. प्रस्ताव मंजूर नसतांना निविदा काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यानंतर याप्रकरणात हालचालींना वेग आलाय. मुख्यमंत्री फडणवीसांना आरोग्य विभागाच्या ३२०० कोटी रूपयांच्या कामांना स्थगिती दिल्यानं तानाजी सावंत यांच्यावरील संशय वाढलाय...