महामहीम राज्यपाल चिंता नको; तुरुंगात अर्णब गोस्वामींची योग्य खातीरदारी होतेय: गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण
राजशिष्टाचाराच्या भंग करून राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी आरोपी अर्णब गोस्वामीची काळजी घेण्यात सांगितल्यावर गृहमंत्री आणि देशमुख यांनीही याच पद्धतीने राज्यपालांना प्रत्युत्तर दिले आहे.
X
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांची रवानगी तळोजा रुग्णालयात हलविल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करुन त्यांची काळजी घेण्यास सांगितले होते. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन गोस्वामी यांच्या परिस्थितीविषयी भाष्य केले. ते म्हणाले की, अर्णब गोस्वामी यांची तुरुंगात योग्य ती काळजी घेतली जात आहे.
अर्णब यांना कुटुंबियांची भेट घेऊ द्यावी, असेही राज्यपालांनी सुचविले होते. मात्र कोरोनाकाळात कैदी आणि कुटुंबियांची भेट घेऊ दिली जात नाही. कोरोना संकट आल्यापासून इतर कैद्यांनाही कुटुबियांची भेट घेऊ दिलेली नाही, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.देशमुख पुढे म्हणाले की, अर्णब गोस्वामी हे तुरुंग प्रशासनाची परवानगी घेऊन कुटुबियांशी फोनवर बोलू शकतात. परंतु व्हिडिओ कॉल लावणे चूक ठरू शकते. मात्र कोरोनामुळे कुटुंबियांची भेट घेऊ देता येत नाही. कैद्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने सुरक्षेचा उपाय म्हमून हा निर्णय घेण्यात आल्याचेही ते म्हणाले. तसेच अर्णब प्रकरणात राजकारण होत असून त्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे अधिक भाष्य करणार नसल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
आजच हायकोर्टाने अर्णब गोस्वामी यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. जामीनासाठी सत्र न्यायालयातच अर्ज करावा, असे हायकोर्टाने सांगितले आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस अर्णब गोस्वामी यांचा मुक्काम तळोजा तुरुंगातच असू शकतो, असा कयास बांधला जात आहे. तर दुसरीकडे भाजप आमदार राम कदम यांनी अर्णब गोस्वामी यांना भेटण्यासाठी तुरुंगात जाणार असून हिंमत असेल तर अडवा, असे आव्हान राज्य सरकारला दिले आहे.