Home > News Update > देशातील सर्वांत उंच ध्वज नगर जिल्ह्यात फडकणार, स्वराज्यध्वज यात्रेला आरंभ

देशातील सर्वांत उंच ध्वज नगर जिल्ह्यात फडकणार, स्वराज्यध्वज यात्रेला आरंभ

देशातील सर्वांत उंच ध्वज नगर जिल्ह्यात फडकणार, स्वराज्यध्वज यात्रेला आरंभ
X

देशातील सगळ्यात उंच ध्वज हा महाराष्ट्रात उभा राहणार आहे. स्वराज्यध्वज म्हणून हा ध्वज ओळखला जाईल, या स्वराज्य ध्वजाच्या यात्रेला अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथून सुरूवात झाली आहे. स्वराज्यध्वज हा स्वराज्याचा, सर्व जातीधर्मांच्या लोकांचा ध्वज असून आपल्या वैभवशाली इतिहासाची माहिती सर्वदूर पोहोचवण्यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.



लोकसहभागातून परंतु कोरोना साथी संबंधित सर्व सामाजिक नियमांचे पालन करून ही ध्वज यात्रा पुढील ३७ दिवस चालणार आहे, अशी माहिती या यात्रेचे आयोजक रोहित पवार यांनी दिली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील गोदड महाराज मंदिरातातून गुरूवार सुरूवात झाली. रोहित पवार यांच्या ध्वजा पूजनानंतर स्वराज्यध्वज यात्रेला सुरूवात झाली. १२ हजार किलोमीटरचा प्रवास करून स्वराज्यध्वज पुन्हा महाराष्ट्रात येणार आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्हे, भारतातील ६ राज्ये, ७४ प्रेरणास्थळे अशी ही यात्रा असेल.



दसऱ्याच्या मुहूर्तावर या ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. हा ७४ मीटर लांबीचा भगवा ध्वज देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात उंच ध्वज असेल असा दावा करण्यात येतो आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड येथील शिवपट्ट्ण अर्थातच भुईकोट किल्ल्याच्या आवारात ध्वजस्तंभ तयार होतो आहे.

Updated : 9 Sept 2021 2:28 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top