Home > News Update > राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा

राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा

राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा
X

देशात लोकसभेच्या निवडणुका जाहिर झाल्या असून अनेक पक्ष मित्र पक्षांसह जागावाटप जाहीर करत आहेत. देशातील यंदाची निवडणूक ही इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए अशी रंगत पाहायला मिळणार आहे. देशासह राज्यात आघाड्यांमध्ये जागा वाटपासाठी चुरस आहे. त्यात आता यंदाची लोकसभा निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही लढवणार आहेत. त्यामुळे मनसे यंदा एकट्याने ही निवडणूक लढतेय की कोणाच्या पाठिंब्याने हे पाहावं लागणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दिल्लीत दौऱ्यावर दरम्यान यावेळी ते दिल्लीत अमित शाह यांची भेट घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय वर्तूळात मनसे महायुतीत सामील होणार का ? अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे. २०१९ च्या लोकसभेत मनसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांना पाठिंबा दर्शवला होता. मात्र, २०२४ ची लोकसभा निवडणूक राज ठाकरेंनी लढवण्याचा निर्धार केला आहे. यासाठी मनसेने मतदारसंघांची चाचपणीही सुरू केली आहे. अनेकदा त्यांची उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यासोबत गुप्त बैठक झाल्या आहेत. आज राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर असू उद्या अमित शाहासह वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे ठाकरे शाह यांच्या भेटीच्या चर्चेला उधाण आलं आहे. अनेकदा भाजपला खडेबोल सुनावणारे राज ठाकरे हे महायुतीत सामील होती का ? दरम्यान या बैठकीत काय निर्णय होणार ठाकरेंना महायुतीत स्थान मिळणार का ? की मनेस 'एकला चलो' चा नारा देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Updated : 19 March 2024 9:28 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top