अफगाणिस्तान मध्ये नवीन तालिबान सरकारची घोषणा, एकाही महिलेचा समावेश नाही
अफगाणिस्तानमध्ये अखुंद यांच्या नेतृत्वाखाली नव्या तालिबान सरकारची घोषणा करण्यात आली आहे. जाणून घ्या नवीन तालिबान सरकारच्या मंत्र्यांविषयी?
X
अफगाणिस्तानवर तालिबानने 15 ऑगस्टला वर्चस्व मिळवल्यानंतर आज अखेर तालिबानने आपल्या नव्या सरकारची घोषणा केली आहे. विशेष बाब म्हणजे तालिबानच्या या नवीन सरकारमध्ये एकाही महिलेचा समावेश नाही. काही दिवसानंतर कॅबिनेट विस्तारात महिला मंत्र्यांचा समावेश केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वीस वर्षांनंतर अमेरिकेनं अफगाणिस्तानमधून आपलं सैन्य मागे घेतल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.
अफगाणिस्तानचं नेतृत्व आता मुल्ला हसन अखुंद (Mullah Mohammed Hassan Akhund) यांच्याकडे असणार आहे.
कोण आहे मुल्ला हसन अखुंद?
मोहम्मद हसन अखुंद हे आता अफगाणिस्तानचे कार्यवाहक पंतप्रधान म्हणून काम पाहतील. मुल्ला मोहम्मद हसन अखुंद हे एक तालिबानचे अनुभवी नेते आहेत. तालिबान चे संस्थापक मुल्ला उमर यांचे निकटवर्तीय आणि राजकीय सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे.
अखुंद यांनी तालिबानच्या आधीच्या राजवटीत उप परराष्ट्र मंत्री म्हणून काम केले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रतिबंधीत यादीत त्यांचा समावेश आहे. अफगाणिस्तानचा मुख्य प्रांत कंधारचे राज्यपाल म्हणूनही काम केले आहे. संयुक्त राष्ट्र संघाने अखुंदला "सर्वात प्रभावी तालिबान कमांडर'' म्हणून घोषित केले आहे.
राजकीय उपप्रमुख अब्दुल घनी बरादर Abdul Ghani Baradar
तालिबानच्या मोहिमेतील सुरुवातीच्या सहभागींपैकी एक अब्दुल घनी बरादार यांनी तालिबानचे संस्थापक मुल्ला मुहम्मद उमर यांचे प्रमुख सहाय्यक म्हणून काम केले आहे. २०१० मध्ये अमेरिकेच्या दबावाखाली पाकिस्तानच्या अटकेपर्यंत चळवळीच्या लष्करी कारवाईचे नेतृत्व बरादर याने केले होते. ते गनिमी काव्यामध्ये पारंगत आहे.
तीन वर्ष पाकिस्तानी तुरुंगात आणि त्यानंतर काही वर्ष नजरबंद राहिल्यांनंतर, 2019 मध्ये अमेरिकेच्या दबावाखाली बरादारची सुटका करण्यात आली. जेव्हा ट्रम्प सरकार 2020 मध्ये तालिबानशी शांतता करार करण्यासाठी वाटाघाटी करत होते आणि त्यासाठी त्यांना मदतीची गरज होती.
गृहमंत्री - सिराजुद्दीन हक्कानी कोण आहे?
सिराजुद्दीन हक्कानी हा एका सुप्रसिद्ध मुजाहिद्दीन व्यक्तीचा मुलगा आहे, जो पाकिस्तानमधील एका ठिकाणाहून लढाऊ आणि धार्मिक शाळांच्या विशाल नेटवर्कचे निरीक्षण करतो. 48 वर्षीय हक्कानी याने तालिबानच्या अलीकडील लष्करी कारवायांचे नेतृत्व केले आहे. त्यांच्या हक्कानी नेट्वर्कसचे पाकिस्तानी गुप्तचर संस्थांशी घनिष्ठ संबंध असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, हक्कानी नेटवर्क हा अफगाणिस्तानात अमेरिकेच्या उपस्थितीचा कट्टर विरोधक होता.
अमेरिकेच्या लोकांवर झालेले आत्मघाती हल्ले आणि हत्या घडवून आणण्यास सिराजुद्दीन हक्कानी जबाबदार होता. हक्कानी आणि त्याच्या नेटवर्कचेही अल-कायदाशी घनिष्ठ संबंध आहेत.
असंही म्हंटल जातं की, 2001 मध्ये अमेरिकेच्या हल्ल्यानंतर तोरा बोरा येथील मुख्यालयातून ओसामा बिन लादेनला पळून जाण्यास यानेच मदत केली होती.
संरक्षणमंत्री - मुल्ला याकूब कोण आहे?
लष्करी नेता मुल्ला मुहम्मद याकूब Mohammad Yaqoob अफगाणिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांची जबाबदारी घेणार आहेत. मुल्ला उमरचा मुल्ला मुहम्मद याकूब हा तालिबानच्या लष्करी दलाचा प्रमुख म्हणून काम करतो. हक्कानी पदानुक्रमातील दुसऱ्या क्रमांकासाठी आव्हान देण्याची शक्यता मध्यंतरी व्यक्त केली जात होती.
दरम्यान, याकुब त्याचे वडिल मुहम्मद याकुब यांच्या पेक्षा कमी समजूतदार असल्याचं बोललं जातं.
परराष्ट्र मंत्री - आमिर खान मुत्ताकी कोण आहे?
मुत्तकी तालिबान च्या मागच्या सरकार मध्ये उच्च शिक्षण मंत्री राहिलेले आहेत. मुत्तकी ने पंजशीर मध्ये निर्माण झालेला विद्रोह शांत करण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र, त्यात त्यांना अपयश आले.