नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाई करा, मी तुमच्या पाठिशी आहे: अनिल देशमुख
X
कायदा व सुरक्षा राखण्यासाठी पोलिसांनी नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाई करा. मी तुमच्या पाठिशी आहे , असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. नागपूर "शहरात गुन्ह्यांचे प्रमाण बरेच आहे. बॉडी वॉर्न कॅमेरा पोलिसांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहेत. पोलिसांशी हुज्जत घालणे, महिलांसोबत छेडछाड करणे, असे अनेक प्रकार रोज घडत असतात. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आरोपींना पकडण्यासाठी बॉडी वॉर्न कॅमेऱ्याचा उपयोग करता येऊ शकतो," असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.
तसेच गरज पडल्यास शहराच्या सुरक्षेसाठी ड्रोन कॅमेरेसुद्धा पुरवायला तयार आहे. तुम्ही नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाई करा. मी तुमच्या पाठिशी आहे, असेही देशमुख म्हणाले. नागपुरातील वाहतूक पोलिसांना अनिल देशमुख यांच्या हस्ते बॉडी वॉर्न कॅमेरे देण्यात आले.
नागपूर शहर राज्याची उपराजधानी आहे सोबतच वाढत्या लोकसंख्येच्या मानाने नागपूर शहराचा नंबर आहे. त्यामुळे इथली वाहतूक व्यवस्था सुद्धा तेवढीच सुदृढ राहणे गरजेचे आहे त्यामुळे आता या पोलिसांना हायटेक बनविण्यात येत आहे. या पोलिसांच्या छातीवर लागलेला कॅमेरा त्याच्या पुढे येणाऱ्या सगळ्या गोष्टी टिपणार तर आहेच पण त्या डायरेकत कंट्रोल रूम मध्ये दिसणार आहे.
नागपूर पोलिसांना २०० कॅमेरे देण्यात आले त्या पैकी दहा कॅमेऱ्यात वितरण गृहमंत्र्यांनी केलं हे कॅमेरे आता संपूर्ण महाराष्ट्रातील वाहतूक पोलिसांना दिले जाणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली. यावेळी बोलताना गृहमंत्र्यांनी सायबर गुन्हेगारांपासून नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन सुद्धा केलं. वॅक्सिनच्या नव्या नावाने नागरिकांना आरोग्य कर्मचारी म्हणून काही फ्रॉड लोकांचे फोन येऊ शकतात आणि ते तुम्हाला काही माहिती विचारून त्या माध्यमातून सायबर फ्रॉड करण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे त्या पासून सावध राहा, असं आवाहन अनिल देशमुख यांनी केलं.