Home > News Update > औद्योगिक अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करा; उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांच्या सुचना

औद्योगिक अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करा; उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांच्या सुचना

औद्योगिक अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करा; उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांच्या सुचना
X

मुंबई : राज्यामध्ये औद्योगिक अपघात घटना घडत आहेत. पुणे जिल्ह्यातील तळवडे पिंपरी चिंचवड व नागपुर जिल्ह्यातील चाकडोह काटोल येथे कारखान्यात स्फोट होवून अनेक कामगारांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. मृतामध्ये महिला कामगारांची संख्या लक्षणीय होती. औद्योगिक विकासात आघाडीवर असणाऱ्या राज्यात अपघाताच्या घटना टाळण्यासाठी खालील प्रमाणे प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशा सुचना संचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचनालय व कामगार आयुक्त यांना डॉ नीलम गोऱ्हे यांनी केल्या आहेत.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या सुचना

  • • राज्यात सर्व औद्योगिक कारखान्यांची तात्काळ तपासणी करुन बेकायदेशीर कारखान्यांवर कारवाई करावी.
  • कार्यरत मजुरांना आवश्यक सर्व सुरक्षा साधने उपलब्ध करून देणेबाबत सर्व उद्योजकाना सक्त सुचना
  • देणेत याव्यात.
  • प्रत्येक उद्योग आस्थापना यांना त्यांचे उद्योगामध्ये महिला कामगारांना लहान बाळांसाठी हिरकणी कक्ष
  • स्थापन करावा असे स्पष्ट करावे.
  • सर्व कारखान्यांचे फायर सेफ्टी ऑडीट करणेत यावे.
  • सर्व कामगारांना कारखान्यातर्फे विमा सरंक्षण पुरविणेत यावे.
  • अपघातामध्ये मृत व जखमी कुटुंबांचे तात्काळ पुनर्वसन करावे.
  • अपघातग्रस्त कुटुंबांना तात्काळ कारखान्याने आर्थिक मदत करावी.
  • अपघातबाधित मुलांचे व मुलींचे शिक्षणात खंड पडणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • आपत्ती व्यवस्थापन कायद्याची सक्षमपणे अंमलबजावणी करावी

अशा सूचना संचालक औद्योगिक सुरक्षा यांना डॉ. नीलम गोन्हे यांनी दिल्या आहेत




Updated : 14 Feb 2024 12:37 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top