Home > News Update > कर्णधार विराट कोहलीचं अर्धशतक ठरले निष्फळ ;पाकिस्तानकडून टीम इंडियाचा दारुण पराभव

कर्णधार विराट कोहलीचं अर्धशतक ठरले निष्फळ ;पाकिस्तानकडून टीम इंडियाचा दारुण पराभव

कर्णधार विराट कोहलीचं अर्धशतक ठरले निष्फळ ;पाकिस्तानकडून टीम इंडियाचा दारुण पराभव
X

T20 World Cup 2021 : भारत विरुद्ध पाकिस्तान टी 20 विश्वचषक सामना पाकिस्तानने जिंकला आहे , भारतीय संघाच्या फलंदाजांसोबतच गोलंदाजांनी अतिशय सुमार कामगिरी केली. विशेष म्हणजे भारताला एकही विकेट घेता आली नाही. पाकिस्तान संघाने 10 विकेट्सनी दमदार विजय मिळवला आहे. हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. वेगवान गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तान संघाची तीच ओळख या सामन्यात ठळकपणे नमूद होताना दिसली. कारण भारताचे दिग्गज सलामीवीरांना पाकिस्तानने सुमार कामगिरीसह तंबूत परतवले. पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन आफ्रिदीने पहिल्याच षटकात सलामीवर रोहित शर्माचा बळी घेतला.रोहित शर्माला भोपळा देखील फोडता आला नाही. तर तिसऱ्या षटकात त्याने सलामीर के एल राहुलचा त्रिफळा उडवला. एकीकडे भारताच्या एका पाठोपाठ एक अशा विकेट पडत होत्या. तर दुसरीकडे कर्णधार विराट कोहली एकेरी कमान सांभाळताना दिसला. त्याने पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर देत अर्धशतक केले. मात्र हे अर्धशतक निष्फळ ठरले, सूर्यकुमार यादव 8 चेंडूत 11 धावा करुन बाद झाला. तर भारताचा तरुण तडफदार ऋषभ पंतने देखील सुपरफास्ट फलंदाजी केली.भारताने 151 धावांचे लक्ष पाकिस्तान संघांसमोर ठेवले जे पाकिस्तानी सलामीवीरांची पूर्ण केले, भारताला एकही विकेट घेता आली नाही.

152 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानने सुरुवातीपासूनच फलंदाजीत एक वेगळाच क्लास दाखवला. दोन्ही सलामीवीर बाबर आजम आणि रिजवान यांनी उत्कृष्ट अर्धशतक झळकावली. बाबरने 52 चेंडूत 68 धावा केल्या. तर रिजवानने 55 चेंडूत 79 धावा केल्या. एकही विकेट न घेता आल्याने भारताचा 10 विकेट्सनी लाजिरवाणा पराभव झाला आहे.

Updated : 24 Oct 2021 11:20 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top