Home > News Update > जय अमित शाह यांनी तिरंगा का नाकारला?

जय अमित शाह यांनी तिरंगा का नाकारला?

जय अमित शाह यांनी तिरंगा का नाकारला?
X

आझादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत पंतप्रधान मोदी यांनी हर घर तिरंगा अशी हाक दिली होती. त्यानुसार देशभरात तिरंगा रॅली निघाल्या, घराघरावर तिरंगा लावला गेला. राष्ट्रध्वज हा देशाच्या अभिमानाचे प्रतीक आहे, म्हणून त्याचा अपमान होऊ नये, अशी देखील भावना व्यक्त केली जात होती. पण सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह हे याच मुद्द्यामुळे ट्रोल होत आहेत.

एशिया कपमध्ये रविवारी दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात अत्यंत रोमांचकारी सामना रंगला. अखेरच्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याने सिक्सर लगावत भारताचा विजय साकार केला. यावेळी स्टेडियमध्ये उपस्थित असलेल्या फॅन्सने देशाचा तिरंगा फडकावत विजयाचा जल्लोष केला. बीसीसीआयचे सचिव असलेले जय शाह देखील यावेळी त्याच स्टेडियममध्ये उपस्थित होते. त्यांनीही जल्लोष केला पण यावेळी त्यांना एका सहकार्याने तिरंगा हातात देण्याचा प्रयत्न करताच जय शाह यांनी तिरंगा नाकारल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर जय शाह यांना सध्या विरोधकांनीही टार्गेट केले आहे. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनीही "मेरे पास पापा हैं, तिरंगा अपने पास रखो!" असे उपरोधिक ट्विट करत जय शाह यांचा मॅचमधील तो व्हिडिओ ट्विट केला आहे.

त्याचबरोबर काँग्रेसच्या इतरही नेत्यांनी तो व्हिडिओ ट्विट करत जय शाह आणि अमित शाह यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान जय शाह यांच्यातर्फे या वादावर कोणतेही स्पष्टीकरण अद्यापपर्यंत देण्यात आलेले नाही.

Updated : 29 Aug 2022 1:33 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top