Home > News Update > पिंपरी चिंचवडमधील विविध उपक्रमांसाठी स्वीडन सहकार्य करेल- अ‍ॅना लेकवेल

पिंपरी चिंचवडमधील विविध उपक्रमांसाठी स्वीडन सहकार्य करेल- अ‍ॅना लेकवेल

पिंपरी चिंचवडमधील विविध उपक्रमांसाठी स्वीडन सहकार्य करेल- अ‍ॅना लेकवेल
X

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये स्वीडनच्या वतीने आवश्यक ते सहकार्य करण्याबाबत स्वीडनच्या कौन्सिल जनरल श्र

अ‍ॅना लेकवेल व आयुक्त राजेश पाटील आणि सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे . स्वीडनच्या कौन्सिल जनरल अ‍ॅना लेकवेल आणि कौन्सिल एरिक मालमबर्ग यांनी महापालिकेला भेट दिली त्यावेळी आयुक्त राजेश पाटील व पक्षनेते नामदेव ढाके यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्प व महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. पिंपरी चिंचवड शहरात क्रीडा संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या महापालिकेच्या प्रयत्नांना सहकार्य करण्यासाठी स्वीडन सकारात्मक असल्याचे अ‍ॅना लेकवेल यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्या समवेत झालेल्या बैठकीत सांगितले.

शहरातील फुटबॉल खेळाडूंना एसकेएफ कंपनीचे वतीने सहकार्य करण्यात येत असून यापुढेही स्वीडीश कारखाने मदत करणार असल्याचेही यावेळी श्रीमती अ‍ॅना लेकवेल यांनी सांगितले.

मुंबई पुणे रस्त्यावर स्वीडीश कंपन्यांच्या वतीने क्षेत्र विकास करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी झाला होता. परंतू कोवीडमुळे त्यास गती देता आली नाही. त्यास गती देण्याचा निर्णयही या पथकासमवेत झालेल्या चर्चेत झाल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे ,मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निलकंठ पोमण सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे उपस्थित होते.

Updated : 16 Sept 2021 11:33 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top