Home > News Update > कृषी विभागाच्या हलगर्जीपणामुळे खतांचा तुटवडा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

कृषी विभागाच्या हलगर्जीपणामुळे खतांचा तुटवडा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

राज्यात खरीप हंगामपुर्व नियोजवनात कृषी विभागाने केलेल्या हलगर्जीपणामुळेच वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांना खताचा मुबलक पुरवठा होत नसल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

कृषी विभागाच्या हलगर्जीपणामुळे खतांचा तुटवडा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा
X

राज्यात खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरू आहे. त्यातच कृषी विभागाने शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा पडणार नसल्याचे म्हटले आहे. मात्र वाशिम जिल्ह्यात कृषी विभागाच्या हलगर्जीपणामुळे खतांचा तुटवडा निर्माण झाला असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख दामुअण्णा इंगोले यांनी व्यक्त केले.

दामूअण्णा इंगोले म्हणाले की, कृषी विभागामुळे खताचा तुडवडा निर्माण होत असून त्याचा भुर्दंड शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. त्यामुळे आज डी एपी खतांच्या गोण्या शेतकऱ्यांना भेटत नाहीत. मात्र डी ए पी चा बफर स्टॉक हा दुकानदारांनी दुकान दारालाच विकला. जेणेकरून शेतकऱ्यांना खत ज्यादा दराने विकता येईल. मात्र असा प्रकार सुरू असताना कृषी विभाग या प्रकाराकडे संपूर्णपणे डोळेझाक करीत आहे.

तसेच दुकानदार शेतकऱ्यांना खत विकताना खताबरोबर इतर वस्तू विकत घेण्यासाठी दबाव आणत आहेत. त्यामुळे खतांसोबत इतर वस्तु खरेदी केल्या नाहीत तर शेतकऱ्यांना खत मिळत नसल्याचे चित्र आहे, असे इंगोले यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांची ससेहोलपट

पुढे बोलताना इंगोले म्हणाले की, वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास होत आहे. कृषी विभागाने याकडे लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा स्वाभिमानी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दामुअण्णा इंगोले यांनी दिला आहे.

Updated : 5 Jun 2022 8:14 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top