Home > News Update > तोमर साहेब,उत्पन्न दहापटीने वाढले असेल तर आयातीची गरजंच काय...? स्वाभिमानीचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना खडा सवाल

तोमर साहेब,उत्पन्न दहापटीने वाढले असेल तर आयातीची गरजंच काय...? स्वाभिमानीचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना खडा सवाल

तोमर साहेब,उत्पन्न दहापटीने वाढले असेल तर आयातीची गरजंच काय...? स्वाभिमानीचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना खडा सवाल
X

दोन दिवसांपुर्वी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र नरेंद्रसिंह तोमर यांनी "शेतकर्‍यांचे उत्पन्न दहापट वाढले"असे विधान म्हणजे फक्त अकलेचे तारे तोडण्याचा प्रकार असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल म्हणाले आहेत.

यासंदर्भात बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल म्हणाले की तोमर यांचे विधान म्हणजे निव्वळ अकलेचे तारे तोडण्याचा प्रकार आहे,देशातील शेतकरी हा खतेदरवाढ,कोसळलेले बाजारभाव यांमुळे शेतकरी प्रचंड संकटात असतानाच अशी विधाने करून तोमर हे देशातील शेतकरी किती समृध्द झाले आहेत असे भासवू इच्छितात का ? कृषीमंत्र्यांचे हे विधान म्हणजे त्यांनी देशातील शेतकर्यांसोबत केलेली कुचेष्टा च आहे. अशी टिका बागल यांनी यावेळी केली आहे.

कृषीमंत्री यांचे हे व्यक्तव्य हे गंभीर आहे,त्यांच्या मतानुसार विचार केल्यास जर देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दहापटीने वाढले असेल तर देशात होणारी फळेभाजीपाला,कडधान्ये व खाद्यतेल यांची आयातीची गरजचं काय..? आर्थिक वर्षामध्ये 20 हजार कोटींचा भाजीपाला,तसेच तब्बल एक लाख चाळीस हजार कोटींचे पाम,सुर्यफुल,सोयातेल आयात करण्यात आले आहे,सहालाख टन सोयाडिओसी आयात करण्यात आली आहे,तसेच मार्च 2023 म्हणजेच सुमारे वर्षभराचे तुर,मुग,उडीद यांचं मुक्त आयातीचे धोरण केंद्र सरकारने निश्चित केले आहे त्यामुळे येणाऱ्या वर्षभरात कडधान्याची भरमसाठ आयात होणार आहे.

जर देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दहापटीने वाढले असेल तर आयातीची गरजचं काय असा सवाल यावेळी बागल यांनी उपस्थित केला आहे.उत्पन्न वाढुन देखील आयातीचे धोरण सुरूच ठेवून केंद्र सरकार एकप्रकारे देशातील शेतकर्‍यांना मातीमोल दर देण्याचे पाप करत आहे. शेतकऱ्यांचे मरण हेच केंद्र सरकारचे धोरण आहे हे या वक्तव्यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे अशी सडकून टिका देखील यावेळी बागल यांनी केली.

Updated : 29 April 2022 4:57 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top