नुपूर शर्मा यांना दणका, देशाची माफी मागा - सुप्रीम कोर्ट
X
देशात धार्मिक द्वेषाचे वातावरण पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने मोठा दणका मिळाला आहे. मोहंमद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दणका दिला आहे. नुपूर शर्मा यांना अत्यंत कडक शब्दात फटकारत न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यामूर्ती जेबी पारदीवाला यांनी अत्यंत मोठा निर्णय दिला आहे.
नुपूर शर्मांच्या वक्तव्याने देशातील जनतेच्या भावना भडकल्या. आज जे काय देशात होत आहे, यासाठी नुपूर शर्मा जबाबदार आहे, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. "ज्या पद्धतीने त्या महिलेने वक्तव्य केले त्यानंतर देशात संतापाची लाट आहे. याला त्या एकट्या जबाबदार आहेत. त्यांनी ज्या पद्धतीने प्रक्षोभक वक्तव्य केले, तो आम्ही तो कार्यक्रम पाहिला. त्यांनी हे सर्व बोलल्यानंतर आपण वकील असल्याचे सांगणे हे हा तर निर्लज्जपणाचा कळस आहे. त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे."
एवढेच नाही तर ज्या न्यूज चॅनेलवर हे चर्चासत्र झाले, ज्यामध्ये नुपूर शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते, त्याही चॅनेलला देखील कोर्टाने फटकारले आहे. पोलिसांनी जे काही केलं त्या संदर्भात बोलायला लावू नका, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना फटकारले. नुपूर शर्मा यांनी सत्र न्यायालयासमोर हजर व्हायला हवं, असेही कोर्टाने म्हटले आहे. एका पक्षाची प्रवक्ता आहे म्हणजे त्यांना काहीही बोलण्याचा अधिकार मिळतो का? असा संतप्त सवाल देखील कोर्टाने विचारला आहे.
न्यायालयाने हे ताशेरे ओढल्यानंतर नुपूर शर्मांच्या वकिलांनी नुपूरने यांनी हेउत्तर अँकरनेने विचारलेल्या प्रश्नावर दिलं असल्याचं सांगितलं. यावर न्यायालयाने अँकरच्या विरोधात गुन्हा चालायला हवा, असेही कोर्टाने विचारले. मुळात जे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यावर डिबेट का केली जाते आहे, असा सवालही कोर्टाने विचारले.