Home > News Update > भंडारा शहरातील अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या संशयितास अटक

भंडारा शहरातील अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या संशयितास अटक

भंडारा शहरातील अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या संशयितास अटक
X

ओळखीचा गैरफायदा घेत भंडारा शहरातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या संशयितास भंडारा शहर पोलिसांनी 24 तासात अटक केली आहे. अजय श्याम गिरी असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून ताे नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्याच्या नवरगावदेवी येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

भंडारा शहरातील एका कापड दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या आईने भंडारा शहर पोलिसात दाखल केली हाेती. याबाबत पाेलिसांनी सायबर सेलच्या मदतीने संबंधित मुलीचे मोबाईल लोकेशन तपासले असता, पाेलिसांना ते मौदा तालुक्याच्या नवरगावदेवी येथे मिळून आले.मात्र पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन चौकशी केली असता ती मुलगी तेथे मिळून आली नाही, पाेलिसांनी पुन्हा तपास चक्रे फिरवून अजय गिरी याला अटक केली.

याबाबत पोलीस उपनिरीक्षक राहाटे यांनी माहिती देताना म्हटले आहे की, संबंधित मुलीच्या आईकडून तक्रार दाखल झाल्यानंतर तातडीने संशयित आरोपीचा शोध सुरु केला. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातीलल खापा येथे संशयितास व संबधित मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Updated : 23 Sept 2021 8:21 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top