Home > News Update > #sushantsinghrajputCase - CBIची कारवाई सुरू, 6 जणांविरुद्ध FIR दाखल

#sushantsinghrajputCase - CBIची कारवाई सुरू, 6 जणांविरुद्ध FIR दाखल

#sushantsinghrajputCase - CBIची कारवाई सुरू, 6 जणांविरुद्ध FIR दाखल
X

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) अनैसर्गिक मृत्यू प्रकरणी अखेर सीबीआयने कारवाईला सुरूवात केली आहे. सीबीआयने 6 जणांविरोधात FIR दाखल केला आहे. यामधअये रिया चक्रवर्ती, (rhea chakraborty) तिचे वडील, आई, भाऊ, सॅम्युअल मिरांडा आणि श्रृती मोदी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुजरात केडरचे IPS अधिकारी मनोज शशीधर यांच्या नेतृत्वाखाली SITची स्थापना करण्यात आली असून चौकशीला सुरूवात झाली आहे. या पथकामध्ये डीआयजी गगनदीप, आयओ अनिल यादव यांचाही समावेश आहे.

बिहारमध्ये सुशांत सिंहच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर बिहार पोलिसांचे पथक मुंबईत चौकशीसाठी आले होते. पण मुंबईत आलेल्या पथकातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला मुंबई महापालिकेने सक्तीने क्वारंटाईन केले. त्यानंतर हा वाद चिघळला आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी मुंबई पोलिसांवर तीव्र नाराजी व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना फोन करुन तक्रार केली होती.

हे ही वाचा...

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण, मॅक्स महाराष्ट्रच्या बातमीवर शिक्कामोर्तब

सुशांतनंतर आणखी एका अभिनेत्याची आत्महत्या

पुरस्कारवापसी, डॉ.शीतल आमटेंनी परत केला ‘दुर्गा पुरस्कार’

त्यानंतर बिहार सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची शिफारस केली आणि केंद्राने तातडीने ही शिफारस मान्य करत सुप्रीम कोर्टात तशी माहितीही दिली होती. याप्रकरणाचा तपास मुंबई पोलीस योग्य दिशेने करत आहेत त्यामुळे याचा तपास सीबीआयकडे देण्याची गरज नाही अशी भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे.

Updated : 7 Aug 2020 6:53 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top