Home > News Update > सुशांत सिंह राजपूतचं ट्वीटर हँडल व्हेरीफाय कसं झालं?

सुशांत सिंह राजपूतचं ट्वीटर हँडल व्हेरीफाय कसं झालं?

सुशांत सिंह राजपूतचं ट्वीटर हँडल व्हेरीफाय कसं झालं?
X

अभिनेता सुशांत सिंह राजपूत चं ट्वीटर हँडल वर पुन्हा एकदा ब्लू टीक दिसू लागलीय. सुशांत सिंह राजपूत च्या आत्म-हत्येनंतर ही त्याच्या फॅन्स नी हार मानली नाही आणि त्याच्या संशयास्पद मृत्यूच्या चौकशीसाठी सातत्याने समाजमाध्यमांवर आवाज उठत राहिला. Elon Musk ने अचानक सर्वांची ब्लू टिक काढून घेतली आणि या सेवेसाठी पैसे मोजावे लागतील असं जाहीर केलं, त्यानंतर २.४ मिलिअन फॉलोअर्स असलेल्या सुशांत सिंह राजपूत या ट्वीटर हँडल ची ही ब्लू टिक निघून गेली होती.




Men have emotions too so don't be shy to cry. It's okay to let it out and not hold it inside. It's not a weakness but a sign of strength. Be man enough to feel. Feeling is human

पुरूषांना ही भावना असतात, त्यामुळे रडण्यासाठी लाजू नका असा संदेश मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच सुशांत सिंह राजपूत ने दिला होता. त्यानंतर त्याची आत्म-हत्या हा वादाचा विषय बनला होता. आज ही अधून मधून सुशांत सिंह राजपूत च्या मृत्यूचं प्रकरण चर्चेत येत असतं. सुशांत च्या समर्थनार्थ सोशल मिडीयावर सातत्याने ट्रेंड ही चालू असतात. #SSR #SushantSinghRajput असे हॅशटॅग आजही चालू असतात. ट्वीटर ने ब्लू टिक परत दिल्यामुळे सुशांत सिंह राजपूतच्या फॅन्स मध्ये आनंदाची भावना आहे, मात्र हे हँडल ट्वीटर ब्लू ला सबस्क्राइब असल्याचं दाखवत असल्याने सुशांत च्या अकाऊंट च्या व्हेरिफिकेशन साठी नेमके कोणी पैसे मोजले असं ही चर्चिलं जात आहे. मृत व्यक्तीचा नंबर कोणी व्हेरीफाय केला, असा सवाल ट्वीटर ला विचारला जात आहे.





Updated : 24 April 2023 11:09 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top