संतप्त एसटी कर्मचाऱ्यांच्या घोळक्यात शिरल्या सुप्रिया सुळे
उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटेल, अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाच एसटी कर्मचाऱ्यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर चपला फेकल्या. यावेळी संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या घोळक्यात सुप्रिया सुळे शिरल्याचे दिसून आले.
X

नुकतेच एसटी (st workers) कर्मचाऱ्यांचे आंदोलन संपतय की काय असे वाटत असतानाच एसटी कर्मचारी पुन्हा आक्रमक झाले आहेत. आज एस टी कर्मचाऱ्यांनी महाविकास आघाडीचे जेष्ठ नेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या मुंबईमधील सिल्वर ओक (silver oak)या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले.ते आंदोलन शांत करण्यासाठी सुप्रिया सुळे आंदोलनात शिरल्याचे दिसून आले.
दरम्यान खासदार सुप्रिया सुळे या थेट संतप्त कर्मचाऱ्यांच्या घोळक्यात शिरल्या. त्यांनी निर्भिडपणे कर्मचाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुप्रिया सुळे माझी सर्व कर्मचाऱ्यांशी बोलण्याची तयारी आहे.मात्र शांततेच्या मार्गाने हा प्रश्न सोडवण्याचा पर्याय त्यांनी संतप्त कर्मचाऱ्यांसमोर ठेवला.
माझी आई आणि मुलगी घरात आहेत.त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी माझ्यावर आहे.त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करु द्या. त्यानंतर मी पुन्हा तुमच्याशी शांततेच्या मार्गाने संवाद साधायला तयार आहे, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी केली.
एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं असून मोठ्या प्रमाणात कर्मचारी शरद पवार यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहेत. याठिकाणी चप्पल आणि दगडफेक सुरू झाली आहे. कर्मचाऱी आक्रमक झाले असून कोर्टाचा निर्णय मान्य नसल्याचे त्यांनी सांगितलं. या संपूर्ण परिस्थितीला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.