Home > News Update > देशमुख कुटूंबियांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाने ED ला फटकारले

देशमुख कुटूंबियांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाने ED ला फटकारले

देशमुख कुटूंबियांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाने ED ला फटकारले
X

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्याशी संबंधित बांधकाम व्यावसायिक योगेश देशमुख आणि त्यांच्या पत्नी शीतल देशमुख यांच्या वैयक्तिक 11 मालमत्ता ईडी ने जप्त केल्या होत्या. त्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारत या मालमत्ता मुक्त करण्यास सांगितले, असे योगेश देशमुख यांचे वकील विपुल अग्रवाल यांनी सांगितले.

तसेच ED ने जप्त केलेली मालमत्ता ही 180 दिवसानंतरची कारवाई आहे. त्यामुळे कायद्यानुसार अशा प्रकारे 180 दिवसाच्या नंतर मालमत्ता जप्त करता येत नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ED ला योगेश देशमुख आणि शितल देशमुख यांच्या मालमत्ता परत कराव्या लागणार आहेत.

उच्च न्यायालयाने (High Court) दिलेल्या निकालानंतर योगेश देशमुख यांच्या वकीलांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ED ला फटकारत योगेश देशमुख यांच्या कुटूंबियांना दिलासा दिला आहे.


योगेश देशमुख यांच्याशी संबंधित प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा अनावधानाने उल्लेख करण्यात आला आहे. हे प्रकरण शिवसेना नेते प्रताप सरनाइक यांत्याशी संबंधित असून झालेल्या चुकीबद्दल मॅक्समहाराष्ट्र संपादकीय मंडळ मनापासून दिलगिरी व्यक्त करत आहे.

- संपादक



Updated : 10 April 2022 6:17 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top